जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघाला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. या सामन्यानंतर भारतीय संघ थेट महिनाभरानंतर मैदानावर उतरणार आहे. पुढील महिन्यात भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर तिन्ही प्रकारच्या क्रिकेटच्या सामन्यांच्या मालिका खेळेल. या मालिकांसाठी भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. खासकरून टी20 संघात आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केलेल्या खेळाडूंना संधी मिळणार असल्याचे सांगितले जाते.
या दौऱ्यासाठी संघाची निवड पुढील आठवड्यात होऊ शकते. टी20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व हार्दिक पड्या करू शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार, या संघात अनेक युवा खेळाडूंचा समावेश असेल. आयपीएलमध्ये आपल्या खेळाने सर्वांची मने जिंकलेल्या यशस्वी जयस्वाल व रिंकू सिंग यांना संधी मिळणे निश्चित असल्याचे दिसते.
यावर्षी राजस्थान रॉयल्स संघासाठी सर्वोत्तम कामगिरी केलेल्या यशस्वी जयस्वाल याला जागतिक कसोटी अजिंक्य पद स्पर्धेसाठी राखीव खेळाडूंमध्ये स्थान मिळाले होते. मात्र, वेस्ट इंडिज दौऱ्यावर तो आंतरराष्ट्रीय पदार्पण करू शकतो. आयपीएल 2023 मध्ये स्पर्धेतील सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार मिळालेला. त्याने या हंगामात राजस्थान संघासाठी सलामीवीराची भूमिका बजावताना 163 च्या सरासरीने 625 धावा केलेल्या. तसेच देशांतर्गत हंगामात देखील त्याची कामगिरी उत्कृष्ट राहिलेली.
याव्यतिरिक्त कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी रिंकू सिंग याने फिनिशर म्हणून भूमिका बजावली. आंद्रे रसेलसारखा आंतरराष्ट्रीय अष्टपैलू त्याच्या कामगिरीमुळे झाकोळला गेला. त्याने अखेरच्या षटकात सलग पाच षटकार मारून कोलकाताला एक संस्मरणीय विजय मिळवून दिला होता. त्या व्यतिरिक्त देखील त्याने अनेक सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून देण्यात हातभार लावला. त्याने 59 च्या जबरदस्त सरासरीने कोलकातासाठी 474 धावा केल्या.
या व्यतिरिक्त तिलक वर्मा व आकाश मधवाल यांच्यावर देखील निवड समितीची नजर असेल.
(Rinku Singh & Yashasvi Jaiswal are set to be picked for the West Indies T20I series)
महत्वाच्या बातम्या-
“रोहितच्या नेतृत्वात आपण आयसीसी ट्रॉफी नाही जिंकू शकत”, माजी प्रशिक्षकाचे परखड मत
भारताच्या पराभवामागील खरे व्हिलन ‘हे’ 2 खेळाडू! नेटकरीही म्हणाले, ‘बीसीसीआयने त्यांना घेतलंच कशाला?’