अहमदाबाद येथे भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यानच्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेला आजपासून (१२ मार्च) सुरुवात झाली. पहिल्याच सामन्यात भारतीय संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली आहे. दरम्यान, जवळपास वर्षभरानंतर आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या यष्टीरक्षक रिषभ पंतने एक अनोखा फटका खेळत चाहत्यांचे मनोरंजन केले.
रिषभने खेळला पुन्हा तो फटका
इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका गाजवल्यानंतर यष्टीरक्षक रिषभ पंतला जवळपास वर्षभरानंतर भारताच्या टी२० संघात जागा मिळाली. पहिल्या तीन षटकातच केएल राहुल व कर्णधार विराट कोहली संघाच्या अवघ्या तीन धावा झाल्या असताना तंबूत परतले.
चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने पंतला चौथ्या स्थानी फलंदाजीची संधी दिली. त्याने तिसर्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर चौकार मारत आपले खाते उघडले. चौथ्या षटकात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर गोलंदाजी करण्यासाठी आला असताना, त्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर पंतने एक रिव्हर्स स्वीपचा फटका खेळून षटकार वसूल केला. खुद्द जोफ्रा आर्चर यालादेखील हा फटका पाहून आश्चर्य वाटले.
पंतने चौथ्या क्रमांकावर खेळताना या सामन्यात २३ चेंडूंमध्ये २१ धावा काढण्यात यश आले. त्याने २ चौकार व एक षटकार खेचला.
https://twitter.com/ChloeAmandaB/status/1370388734508552192
Kya Shot hey @RishabhPant17 Bhai🔥🤙#INDvEND #RishabhPant pic.twitter.com/1BWLtu7PMu
— 🕶️ (@TheSaiTweets) March 12, 2021
Mind = 🤯 https://t.co/xeKkltqM3b pic.twitter.com/S2Vqof3FeO
— SunRisers Hyderabad (@SunRisers) March 12, 2021
जेम्स अँडरसनविरुद्ध खेळला होता असा फटका
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील अखेरच्या कसोटीत रिषभने शतकी खेळी साकारली होती. यादरम्यान, इंग्लंडचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याला देखील त्याने असाच रिव्हर्स स्वीपचा फटका खेळून चौकार मिळवला होता. त्यावेळी देखील पंतच्या या धाडसाचे व त्या फटक्याचे अनेकांनी कौतुक केले. आपल्याला संधी मिळाल्यास आपण भविष्यातही अशा प्रकारचे फटके खेळू, असे पंतने म्हटले होते.
Wow @RishabhPant17 😂😂😂 pic.twitter.com/389yVwgXPz
— Andrew Flintoff (@flintoff11) March 5, 2021
गंभीरने दिले फटक्याला हे नाव
या सामन्यात प्रसारण वाहिनीसाठी टीव्ही समालोचक म्हणून काम करणारा भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने पंतच्या या फटक्याला नाव दिले. गंभीरने या फटक्याचे ‘रिव्हर्स स्लॅप’ असे नामकरण केले.
युवराजनेही केले कौतुक
रिषभने जोफ्रा आर्चरला रिव्हर्स स्वीप मारत षटकार मारल्याचे पाहून युवराज सिंगने त्याचे कौतुक करणारे ट्विट केले आहे. त्याने ट्विटमध्ये म्हटले की ‘ही नवीन पिढी! खरोखर निर्भीड आहे. रिव्हर्स स्वीप किंवा शॉट, मला माहित नाही त्याला काय म्हणावे. पण रिषभ पंत वेगवान गोलंदाजाला असा फटकार मारल्याबद्दल सलाम तुला.’
This is the new generation !! Absolutely fearless ! Reverse sweep or shot I don’t know what to call it ! But @RishabhPant17 hats off to you to hit a fast bowler like that ! Game on !! #IndiavsEnglandT20
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) March 12, 2021
भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ बाद १२४ धावा केल्या. भारताकडून श्रेयस अय्यरने ६७ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर रिषभ पंतने २१ धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट जिथे विक्रम तिथे! रोहित, धोनी, रैना आणि कार्तिकनंतर ‘अशी’ कामगिरी करणारा बनला पाचवाच भारतीय
लिझेल लीचे शानदार शतक; तिसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिकेच्या महिलांचा भारतावर विजय, मालिकेतही घेतली आघाडी
अर्धवट नशेत असताना हर्षल गिब्जने दक्षिण आफ्रिकेला वनडे मिळवून दिला होता अविस्मरणीय विजय