नुकतेच भारताला ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022 स्पर्धेत रिकाम्या हाताने घरी परतावे लागले. या पराभवानंतर भारतीय क्रिकेटमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय संघातून वरिष्ठ खेळाडूंना बाहेर रस्ता देखील दाखवला जाऊ शकतो. या दरम्यानच भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिक याने युवा यष्टीरक्षक रिषभ पंत याच्याबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
टी20 विश्वचषकात भारतीय संघाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. उपांत्य फेरीत भारतीय संघ इंग्लंडकडून पराभूत झाला. या विश्वचषकात दिनेश कार्तिक व रिषभ पंत या दोघांचा देखील समावेश होता. दोघांनाही मिळालेल्या संधीचा फायदा घेता आला नाही. त्यानंतर न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी कार्तिकला भारतीय संघ स्थान मिळाले नाही. दुसरीकडे रिषभ संघाचा उपकर्णधार म्हणून न्यूझीलंड दौऱ्यावर गेला आहे. तर संघातून वगळलेला कार्तिक पुन्हा एकदा समालोचन करताना दिसला.
न्यूझीलंड विरुद्ध भारत टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यावेळी समालोचन करताना तो म्हणाला,
“आपण रिषभला पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी देतो. मात्र, मला वाटते त्याला आता सलामीला संधी देण्याची वेळ आली आहे. तो कशा प्रकारची फलंदाजी करतो हे आपण सर्वजण जाणतो. पावर प्लेमध्ये तो मोठे फटके खेळू त्याचा स्ट्राईक रेटही उच्च आहे. तो आपला स्वाभाविक खेळ खेळू लागल्यानंतर भले भले गोलंदाज दबावात येतात. तो एक शानदार खेळाडू आहे.”
सध्या कार्तिक 38 वर्षात असल्याने तो आता पुन्हा भारतासाठी खेळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. त्यामुळे रिषभ भारताचा प्रमुख यष्टीरक्षक होऊ शकतो.
(Rishabh Is Best Option For Opener Dinesh Karthik Said)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तोच वेग तीच दहशत! उमराननंतर कश्मिरमधून आला आणखी एक स्पीडस्टार; व्हिडिओ पाहून म्हणाल, “वाह”
सूर्या नाही, न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर ‘हा’ फलंदाज बेस्ट; अनुभवी फिरकीपटूने सांगितले नाव