मुंबई | २०१९ क्रिकेट विश्वचषकापुर्वी टीम इंडियाने वनडे मालिकांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. वनडे प्रकारात सध्या तरी टीम इंडियाला पराभूत करणे केवळ अशक्य असल्याचे कोहलीच्या टीम इंडियाने २०१८-१९मध्ये दाखवून दिले आहे.
गेल्या चार महिन्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्ध खेळलेल्या ५ पैकी ३ मालिकांमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला आहे.
कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियामध्ये संघाला कसोटी आणि वनडे मालिकेत जबरदस्त विजय मिळवून दिला तर टी२० मालिका बरोबरीत सुटली.
तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडमध्ये संघाने १० वर्षात प्रथमच वनडे मालिकेत विजय मिळवला. तसेच टी२० मालिकेत संघाला केवळ ४ गुणांनी शेवटच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे मालिका १-२ अशी गमवावी लागली.
या मालिकांमध्ये अनेक तरुण खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. यात अनुभवी खेळाडू एमएस धोनी, केदार जाधव तसेच अंबाती रायडूने चांगली कामगिरी केली.
निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी या मालिकेनंतर विजय शंकर, रिषभ पंत तसेच अजिंक्य रहाणेच्या विश्वचषक २०१९मधील समावेशाबद्दल मोठे भाष्य केले आहे.
विश्वचषक २०१९मधील टीम इंडियाच्या १५ सदस्यीय संघाचे हे तीन खेळाडू भाग असू शकतात असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
२३ एप्रिल ही विश्वचषक २०१९साठी संघाचे १५ सदस्यीय स्काॅडचे नाव पाठविण्याची शेवटची तारीख आहे.
विजय शंकर टी२० मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये दुसऱ्या स्थानावार राहिला आहे.
“जेवढ्या वेळा विजय शंकरला संधी मिळाली आहे त्याने या संधीचे सोने केले आहे. तो गेल्या दोन वर्षांपासून भारत अ सोबतही चांगली कामगिरी करत आहे. तरीही तो या संघात फीट बसतो किंवा नाही आम्हाला पहावे लागेल.” असे भाष्य त्यांनी विजय शंकरबद्दल केले.

“पंतदेखील विश्वचषकाच्या रेसमध्ये आहे. त्याची निवड करणे ही एक चांगली डोकेदुखी ठरणार आहे. त्याची एक वर्षातील प्रगती ही नक्कीच जबरदस्त आहे. त्याच्यात अजून संयम आणि अनुभव यायला हवा. याचमुळे त्याचा समावेश भारत अ संघात करण्यात आला आहे.”
रहाणेसाठी संघाचे दरवाजे बंद झाले नाहीत. केएल राहुलप्रमाणे तो देखील इंग्लंडला एक राखीव सलामीवीर म्हणून जाऊ शकतो.
रहाणेने देशांतर्गत तसेच इंग्लंड लायन्सविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे तसेच भारताकडून फेब्रुवारी २०१८मध्ये मर्यादित षटकांचे क्रिकेटही खेळले आहे. ” तो एक चांगला खेळाडू आहे. तो देखील विश्वचषक २०१९च्या स्पर्धेत आहे.” असे यावेळी एमएसकेप्रसाद क्रिकइंफोशी बोलताना म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-
–असा राखला माहीने भारतीय ध्वजाचा मान, पहा व्हिडीओ
–हार्दिक पंड्याची जर्सी रोहित शर्माला फिट तरी कशी बसते?
–भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० मालिकेत ४ भारतीय गोलंदाजांची शतके
–आजचा दिवस धोनीचाच! विद्युत वेगाने केलेली स्टंपिंग पहाच
–…आणि हातात ग्लव्ज घालताच धोनीच्या नावावर दिवसातील दुसरा तर कारकिर्दीतील सर्वात मोठा कारनामा