---Advertisement---

पंत जिथे मनोरंजन तिथे! विकेट वाचवण्यासाठी रिषभने जोरदार फिरवली बॅट अन् कार्तिकचं डोकं थोडक्यात बचावलं

On: मंगळवार, सप्टेंबर 28, 2021 9:03 PM
---Advertisement---

शारजाह। मंगळवारी (२८ सप्टेंबर) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ४१ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. या सामन्यात दिल्लीला ३ विकेट्सने पराभव स्विकारावा लागला. पण असे असले तरी दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतबाबत एक मजेशीर घटना घडल्याचे पाहायला मिळाले.

गेल्या काही महिन्यांमध्ये पंत मैदानात आहे, म्हटल्यावर चाहत्यांचे मनोरंजन कोणत्या ना कोणत्या स्वरुपात झालेले पाहायला मिळालेच आहे. असाच काहीसा प्रकार मंगळवारी घडला. शारजा क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात पंतच्या एका कृतीने सर्वांचेच लक्ष वेधले. विशेष म्हणजे त्याच्यामुळे कोलकाताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक दुखापतग्रस्त होता होता बचावला.

झाले असे की प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीकडून चौथ्या क्रमांकावर रिषभ पंत फलंदाजीसाठी मैदानात उतरला. यावेळी १७ व्या षटकात वरुण चक्रवर्ती गोलंदाजी करत होता. त्याच्या पहिल्याच चेंडूवर पंतने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू त्याच्या बॅटची आतली कड घेऊन स्टंपच्या दिशेने जात होता.

यावेळी घाईने पंतने चेंडूला स्टंपला लागण्यापासून वाचवण्यासाठी मागे जोरात बॅट फिरवली. पण, त्याचवेळी तिथे दिनेश कार्तिक उभा होता. त्यामुळे ती बॅट कार्तिकच्या डोक्याला लागण्याची शक्यता होती. मात्र, पंतची बॅट जवळ आलेली पाहून कार्तिकने स्वत:चा बचाव केला. या घटनेनंतर पंत आणि कार्तिक एकमेकांशी काहीतरी बोलतानाही दिसले. या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

https://twitter.com/KartikS25864857/status/1442814444216610818

https://twitter.com/CowCorner9/status/1442817161584529414

कोलकाताचा विजय
या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ बाद १२७ धावाच केल्या. दिल्लीकडून पंतने आणि स्टीव्ह स्मिथने प्रत्येकी ३९ धावांची खेळी केली. याशिवाय शिखर धवनने २४ धावा केल्या. या तिघांव्यतिरिक्त एकालाही दुहेरी आकडा पार करता आला नाही. कोलकाताकडून व्यंकटेश अय्यर, सुनील नारायण आणि लॉकी फर्ग्यूसन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच टीम साऊथीने १ विकेट घेतली.

त्यानंतर १२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग कोलकाताने १८.२ षटकांत ७ विकेट्स गमावत पूर्ण केला. कोलकाताकडून नितीश राणाने सर्वाधिक ३६ धावांची नाबाद खेळी केली. तसेच सुनील नारायणने १० चेंडूत आक्रमक २१ धावांची खेळी केली. तर शुबमन गिलने ३० धावा केल्या. दिल्लीकडून अवेश खानने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच एन्रीच नॉर्किए, कागिसो रबाडा, आर अश्विन आणि ललित यादव यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या –

रोहितसारखा दिसणारा व्यक्ती पाकिस्तानात पितोय सरबत; फोटोने वेधले सोशल मीडियाचे लक्ष

वनडे क्रमवारी: मिताली राजने गमावला अव्वल क्रमांकाचा ताज, पण झूलन गोस्वामीची मोठी झेप

विकेट गेल्याच्या संतापात अश्विनची गोलंदाज साऊथीशी बाचाबाची, मग पंत-मॉर्गनमध्येही जुंपली, अखेर…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---