---Advertisement---

पंत आणि जडेजाने प्लॅनिंग करून इंग्लंडला चोपलंय! व्हिडिओमध्ये केलाय खुलासा

On: सोमवार, जुलै 4, 2022 12:16 PM
Rishabh-Pant-Ravindra-Jadeja-1
---Advertisement---

बर्मिंघमच्या एजबस्टन क्रिकेट ग्राउंडवर  इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाचवा कसोटी सामना रंगाल आहे. सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघाच्या वरच्या फळीतील फलंदाजांनी स्वस्तात विकेट्स गमावल्या होत्या. परंतु रिषभ पंत आणि रवींद्र जडेजाच्या द्विशतकीय भागीदारीच्या जोरावर संघाने मोठी धावसंख्या उभी केली. बीसीसीआय टीव्हीसाठी बोलताना या दोघांनी खुलासा केला की, अखेर कोणत्या रणनीतीसह ते मैदानात उतरले होते.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील हा शेवटचा सामना आहे. मालिकेतील पहिले चार सामने मागच्या वर्षी खेळले गेले होते. कोरोनामुळे शेवटचा सामना रद्द करावा लागला होता, जो यावर्षी पुन्हा आयोजित केला गेला आहे. सामन्याच्या पहिल्या डावात भारताने ४१६ धावा केल्या. यामध्ये रिषभ पंत (Rishabh Pant) १४६, तर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) १०४ धावा करून बाद झाला.

https://twitter.com/BCCI/status/1543601130344591361?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1543601130344591361%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmahasports.glteyepbzg-jqp3vl997450.p.temp-site.link%2Fwp-admin%2Fpost.php%3Fpost%3D219804action%3Dedit

बीसीसीआय टीव्हीसाठी बोलताना पंतने जडेजासोबत झालेल्या मोठ्या भागीदारीविषयी स्वतःचे मत व्यक्त केले. पंत म्हणाला की, “आम्ही दोघे खेळपट्टीवर होतो, तेव्हा सर्वात चांगली गोष्ट हीच होती की, आम्ही नेहमी एकमेकांशी चर्चा करत राहिलो. यादरम्यान आम्ही ठरवले की, आम्हीला छोट्या-छोट्या भागीदाऱ्या करायच्या आहेत. आमची इच्छा नव्हती की, चुकीचा शॉट खेळून बाद व्हावे. त्यामुळे दोघांनी सतत एकमेकांना सांभाळून खेळण्याचे ठरवले.”

स्वतःच्या शतकी खेळीविषयी बोलतना पंत म्हणाला की, “एका आंतरराष्ट्रीय खेळाडूच्या रूपात जेव्हा कधी कसोटी क्रिकेटमध्ये शतक होते, तेव्हा ते खूप महत्वाचे असते. परंतु मी शतकाविषयी जास्त विचार करत नाही. माझे लक्ष यावर असते की, मी जेव्हा मैदानात येईल तेव्हा १०० टक्के योगदान देता येईल.”

“जेव्हा तुम्ही फलंदाजी करत असता, तेव्हा तुम्हाला एका खेळाडूची साथ हवी असते, ज्यावर तुम्हाला विश्वास ठेवता येईल. जडेजा तसाच एक खेळाडू आहे. तो माझ्यासमोर उभा राहिल्यानंतर माझ्या खेळीत खूप फरक पडला. तो एवढा शांत आणि उत्कृष्ट खेळत होता ज्यामुळे मला आत्मविश्वास मिळाला आणि मोठी खेळी खेळू शकलो,” असे पंत पुढे म्हणाला.

दरम्यान, पहिल्या डावात भारताने ४१६ धावा केल्यानंतर इंग्लंडचा संघ मात्र २८४ धावांवर सर्वबाद झाला. त्यांचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेयरस्टोने संघासाठी शतक ठोकले. त्याव्यतिरिक्त इंग्लंडच्या एकही खेळाडूला अर्धशतक देखील करता आले नाही.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

यंदाच्या वर्षी बेयरस्टो ठरलाय शतकांचा सम्राट, वाचा भारताविरुद्ध खेळताना रचलाय कोणता नवा विक्रम?

‘जस्सीला फावल्या वेळात मी फलंदाजीचे प्रशिक्षण दिले’, बुमराहच्या जवळच्या व्यक्तीने घेतले त्याच्या बॅटिंगचे श्रेय

पॉवेलच्या झंझावाती अर्धशतकाने बांग्लादेशचा दारुन पराभव, फक्त ‘एवढ्या’ चेंडूत ठोकली फिफ्टी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---