---Advertisement---

व्हिडिओ: १२ लाखांच्या दंडाच्या भितीने पंतला फुटला घाम; पंचांना म्हणाला, “तो एक मिनिट तुम्हीच घेतला”

On: शुक्रवार, एप्रिल 16, 2021 3:55 PM
---Advertisement---

आयपीएल २०२१ मधील सातवा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात राजस्थानने १४८ धावांचा पाठलाग करताना ३ गडी राखून विजय साजरा केला. मात्र, पराभव झाला असला तरी दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत १२ लाख रुपयांचा दंड लागणार नाही ना या भीतीमध्ये दिसला.

रिषभ दिसला दंडाला घाबरताना
राजस्थान रॉयल्सविरूद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात ३० यार्डच्या सर्कलबाहेर जास्त क्षेत्ररक्षक आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी मैदानातील पंचांनी खेळ थांबविला. यामुळे होणाऱ्या विलंबाची पंतने दखल घेतली आणि पंचांना सांगितले की, ‘हा एका मिनिटाचा उशीर तुमच्यामुळे होत आहे.’ या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

असा आहे नवा नियम
आयपीएल २०२१ मध्ये कोणत्याही संघाने स्पर्धेत तीन वेळा संथ गतीने षटके टाकल्यास, कर्णधारावर एका सामन्याची बंदी लादण्यात येईल. पहिल्या वेळेस अशी घटना घडल्यास १२ लाख तर, दुसऱ्या वेळी २४ लाख दंड आकारण्यात येईल. आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध संथ गतीने षटके टाकल्याने चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

https://twitter.com/mscmedia2/status/1382915441534783488?s=20

https://twitter.com/pant_fc/status/1382905020958445571?s=20

राजस्थानचा रोमहर्षक विजय
प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने कर्णधार रिषभ पंतच्या ५१ धावांच्या जोरावर निर्धारित २० षटकात १४७ धावा काढल्या. राजस्थानसाठी वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकतने सर्वाधिक ३ बळी मिळविले‌. प्रत्युत्तरात, डेव्हिड मिलर (६२) व ख्रिस मॉरिस (नाबाद ३६) यांच्या उपयुक्त खेळ्यांच्या जोरावर राजस्थानने हे आव्हान पार केले. जयदेव उनाडकट सामन्याचा मानकरी ठरला. राजस्थानचा हा स्पर्धेतील पहिला विजय आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

निर्णायक क्षणी कर्णधार पंतने अश्विनवर दाखवला नाही विश्वास, इथेच झाली चुक; प्रशिक्षकाची कबुली

“निवृत्तीनंतरही एबी डिविलियर्स पुन्हा खेळणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट, पण…” प्रशिक्षकाने दिले संकेत

रोहितची थट्टा करणे अँकर मयंतीला पडले महागात, चाहत्यांनी घेतली शाळा; वाचा पूर्ण प्रकरण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---