ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सिडनी येथे चालू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचा आज (११ जानेवारी) पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. भारतीय संघाने २ बाद ९८ धावांपासून खेळायला सुरुवात केली असून कर्णधार अजिंक्य रहाणेची महत्त्वपुर्ण विकेट गमावली आहे. मात्र कसोटी स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजारा आणि यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत मैदानावर टिकून राहिले आणि भारताच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या आहेत.
भारतीय संघाच्या दुसऱ्या व सामन्यातील चौथ्या डावात पंतने आतिशी खेळी करत अर्धशतकाहून अधिक धावा केल्या आहेत. त्याने११८ चेंडूत ३ खणखणीत षटकार सोबत १२ चौकार ठोकत ९७ धावा केल्या आहेत. यासह ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात ५० पेक्षा जास्त धावा करणारा तो सर्वात युवा यष्टीरक्षक ठरला आहे.
पंतने अवघ्या २३ वर्षे ९५ दिवसांच्या वयात ही खास कामगिरी केली आहे. याबरोबरच त्याने माजी ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक आयन हिली यांचा विक्रमही मोडला आहे. हिली यांनी वयाच्या २४ व्या वर्षी २१६ दिवसांचे असताना ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर कसोटी सामन्यातील चौथ्या डावात ५० हून अधिक धावा केल्या होत्या.
Rishabh Pant becomes the youngest keeper to score 50-plus runs in the 4th innings of a Test in Australia – 23y 95d.
The previous youngest was Ian Healy – 24y 216d. #AUSvIND
— Umang Pabari (@UPStatsman) January 11, 2021
भारताला विजयासाठी २०१ धावांची गरज
भारतीय संघाने तिसऱ्या कसोटी सामन्याच्या लंच ब्रेकपर्यंत ३ बाद २०६ धावा फलकावर नोंदवल्या आहेत. त्यांना अजून विजयासाठी २०१ धावांची आवश्यकता आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशीच सलामीवीर रोहित शर्मा आणि शुबमन गिल बाद झाले होते. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवुड याने गिलला ३१ धावांवर झेलबाद केले होते. तर पॅट कमिन्सने ५२ धावांवर रोहितची विकेट काढली होती. त्यानंतर पाचव्या दिवसाच्या सुरुवातीला कर्णधार रहाणे केवळ ४ धावा करत बाद झाला.
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात पंतने नाही केले यष्टीरक्षण
सिडनी कसोटीतील भारतीय संघाच्या पहिल्या डावात तिसर्या दिवशी फलंदाजी करताना रिषभ पंतच्या डाव्या कोपऱ्याला दुखापत झाली होती. पहिल्या डावात ६७ चेंडूत ३६ धावा करणार्या पंतला पॅट कमिन्सच्या शॉर्ट चेंडूवर पूल शॉट खेळताना दुखापत झाली होती. तो पट्टी बांधून फलंदाजी करत होता. मात्र त्या वेगाने धावा काढू शकला नाही. तो जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर यष्टीच्या मागे झेल देवून बाद झाला. आयसीसीच्या नवीन नियमानुसार पंतची जागा वृद्धीमान साहाने घेतली होती आणि ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात त्याच्याजागी यष्टीरक्षण केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
सिराज विरुद्ध वापरले गेले ‘हे’ अपशब्द, बीसीसीआयच्या रिपोर्टमध्ये झाला खुलासा
भोगा आपल्या कर्माची फळं! ‘या’ कारणामुळे ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनला झाला दंड
रिषभ पंत दुसऱ्या डावात फलंदाजी करणार का? जाणून घ्या नेमकी परिस्थिती