---Advertisement---

जिंकलस भावा! रिषभ पंतनेही केला कोरोना विरुद्धच्या लढ्यात मदतीचा हात पुढे; कोरोनाग्रस्तांना होणार ‘ही’ मदत

Rishabh-Pant
---Advertisement---

भारत सध्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेच्या संकटाचा सामना करत आहे. देशात रोज नव्याने लाखो लोक या कोरोना व्हायरसच्या संकटात सापडत आहेत. अशातच वैद्यकीय सुविधांचाही तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण मदतीसाठी पुढे आले आहेत. यात आता भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचीही भर पडली आहे. त्याने मदतीचा हात पुढे केला आहे.

रिषभ पंतने हेमकुंट फाऊंडेशनला दान करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यातून कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलिंडरसह बेड्स, कोविड रिलिफ किट्स आणि इतर आवश्यक वस्तू पोहचवण्यात मदत होईल. तसेच यातून विशेषत: भारतातील ग्रामीण आणि लहान शहरी भागात मदत करण्याची इच्छा रिषभने व्यक्त केली आहे. त्याने ट्विटरवर एक प्रसिद्धी पत्रक जाहीर करत ही माहिती दिली आहे.

त्याने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की ‘मित्रांनो, यावेळी आपला देश निराशेचा सामना करत आहे. हे सर्व पाहून मला खुप दु:ख होत आहे. मी खूप जवळून आपल्या माणसांना गमावताना पाहिले आहे. माझ्या संवेदना त्या सर्व कुटुंबियांबरोबर आहेत, ज्यांनी गेल्या वर्षभरात संघर्ष केला आहे. तसेच जे लोक आपल्याला सोडून गेले त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो.’

त्याने पुढे लिहिले आहे, ‘खेळामुळे मी सर्वात चांगली एक गोष्ट शिकली आहे की एकच लक्ष्य ठेवून सर्वांनी मिळून काम करण्याची ताकद. मी त्या सर्व फ्रंटलाईन कामगारांना सलाम करतो, ज्यांनी गेल्या वर्षभरात न थकता देशाची मदत केली आहे. मला वाटते की या कठीण परिस्थितीत भारताच्या मदतीसाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे.’

तसेच तो करणार असलेल्या मदतीबद्दल त्याने पुढे सांगितले, ‘मी हेमकुंट फाऊंडेशनला अर्थिक दान देत आहे, ज्यामुळे संपूर्ण देशात ऑक्सिजन सिलिंडरसह बेड्स, कोविड रिलिफ किट्स आणि इतर आवश्यक वस्तू पोहचवण्यात मदत होईल. मला या संस्थेसह विशेषत: ग्रामीण भागात आणि मोठ्या शहरांपेक्षा आरोग्याच्या सुविधा कमी असलेल्या छोट्या शहरांमधील लोकांची मदत करायची आहे.’

याबरोबरच पंतने सर्वांना नियमांचे पालन करण्यासही सांगितले आहे. त्याने म्हटले आहे की ‘मी तुमच्या सर्वांना विनंती करतो की तुम्हीही आपापल्यापरीने मदत करा जेणेकरुन आपण देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचू आणि कोविडबद्दल जागरुकता पसरवू शकतो. तसेच लसीकरणाबद्दलही जागरुकता पसरवू शकतो. लक्षात ठेवा सर्वांना सुरक्षित राहायचे आहे आणि सर्वांनी नियमांचे पालन करा आणि शक्य असेल तेव्हा लस घ्या.’

पंतची कामगिरी
नुकतीच आयपीएल २०२१ हंगाम कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे २९ सामन्यांनंतर अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. या हंगामात पंत दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करत होता. त्याने कर्णधार म्हणून या स्पर्धेत चांगली कामगिरी केली. ही स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी दिल्लीने पंतच्या नेतृत्वाखाली ८ सामने खेळले होते. त्यातील ६ सामने जिंकण्यात त्यांना यश मिळाले, तर २ सामने ते पराभूत झाले. त्यामुळे १२ गुणांसह ते स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर होते.

याशिवाय पंतची फलंदाज म्हणूनही या आयपीएल हंगामात चांगली कामगिरी झाली. पंतने या आयपीएल हंगामात ८ सामन्यात २ अर्धशतकांसह ३५.५० च्या सरासरीने २१३ धावा केल्या होत्या.

यापूर्वी अनेक खेळाडूंनी केला मदतीचा हात पुढे
पंतपूर्वीदेखील अनेक क्रिकेटपटू यावेळी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मदतीसाठी पुढे आले आहेत. यात पॅट कमिन्स, ब्रेट ली, निकोलस पूरन, जेसन बेऱ्हेंडॉर्फ अशा परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. तसेच सचिन तेंडुलकर, हार्दिक आणि कृणाल पंड्या, इरफान आणि युसुफ पठाण, गौतम गंभीर, जयदेव उनाडकट, शिखर धवन, विराट कोहली, लक्ष्मीरतन शुक्ला, आर अश्विन असे काही भारतीय खेळाडूंनीही मदतीचा हात पुढे केला आहे. याशिवाय आयपीएलमधील अनेक संघांनीही मदतीचा हात पुढे केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

दिल्लीत कोरोनाचा तांडव, भीतीपोटी विलियम्सनसह ‘या’ किवी खेळाडूंनी वेळेपूर्वीच घेतला भारताचा निरोप

चेन्नईसाठी आनंदाची बातमी! फलंदाजी प्रशिक्षक हसी कोरोना निगेटिव्ह, लवकरच होऊ शकतो ‘या’ देशात रवाना

घरात राहा! मुंबई इंडियन्सचा हटके पद्धतीने सॅनिटायझर बॉटलच्या माध्यमातून खास संदेश

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---