अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर मंगळवारी (२७ एप्रिल) खेळल्या गेलेल्या रोमांचक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने १ धावाने विजय मिळवला होता. तसेच हा सामना सुरू असताना यष्टीमागे उभा असलेल्या रिषभ पंतने असे काहीतरी म्हटले होते, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बेंगलोर संघाकडून एबी डिविलियर्सने तुफानी अर्धशतकी खेळी केली होती. तसेच ग्लेन मॅक्सवेलने देखील २५ धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले होते.
तर झाले असे की बेंगलोर संघाच्या धावा २ गडी बाद ४१ होत्या. त्यावेळी ७ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या अमित मिश्राच्या चेंडूवर ग्लेन मॅक्सवेलने षटकार लगावला होता. हा षटकार पाहून यष्टीमागे उभा असलेल्या रिषभ पंतने म्हटले की, “हा तर खूपच जलद आहे यार.” हे यष्टीमागचे समालोचन ऐकून समालोचक देखील हसायला लागले होते.
असे पहिल्यांदा घडले नाहीये. फलंदाजी करत असताना आक्रमक असणारा रिषभ पंत यष्टीमागे तितकाच चपळ आणि मस्तीखोर स्वभावाचा आहे. तो फक्त आयपीएलमध्येच नव्हे तर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध झालेल्या मालिकांमध्ये देखील आपल्या यष्टीमागच्या समलोचनामुळे भरपूर चर्चेत होता.
https://twitter.com/CricketUnlimi/status/1387059422740946951?s=20
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने उभारला होता १७१ धावांचा डोंगर
बेंगलोर संघातील मुख्य फलंदाज चांगल्याच फॉर्ममध्ये आहेत. बेंगलोर संघाने आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत. यात त्यांना ५ सामन्यांमध्ये विजय मिळवण्यात यश आले आहे. या सामन्यांमध्ये संघातील फलंदाजांनी मुख्य भूमिका बजावली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात एबी डिविलियर्सने तुफानी अर्धशतकी खेळी केली होती. त्याने अवघ्या ४२ चेंडूत ७५ धावांची खेळी केली होती. तर रजत पाटीदार याने देखील ३१ धावांचे योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर बेंगलोर संघाने २० षटक अखेर १७१ धावा केल्या होत्या.
रिषभ आणि हेटमायरचे अर्धशतक गेले वाया
बेंगलोर संघाने दिलेल्या १७२ धावांचा पाठलाग करताना दिल्ली संघातील मुख्य फलंदाज लवकर माघारी परतले होते. त्यानंतर रिषभ पंत आणि शिमरॉन हेटमायर यांनी मिळून सामना शेवटच्या चेंडूपर्यंत नेला होता. रिषभने नाबाद ५८ आणि हेटमायरने नाबाद ५३ धावांची खेळी केली होती. परंतु शेवटच्या चेंडूवर ६ धावांची आवश्यकता असताना, रिषभ पंतने चौकार लगावला आणि हा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने १ धावाने आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! महिला आयपीएल २०२१ सुरू होण्यापुर्वीच संकटात, ‘या’ कारणामुळे हंगाम होणार स्थगित?
“एबीला माझा सलाम, अजूनही वाटत नाही तो निवृत्त झाला आहे,” कोहलीने केली स्तुती
‘तो’ निर्णय घेत रिषभ बचावला अन् कोहलीच्या चेहऱ्याचा रंग उडाला, बघा नक्की काय किस्सा घडला