---Advertisement---

युरो कप नाही तर ‘या’ कारणामुळे रिषभ पंत झाला कोरोना संक्रमित?

On: शुक्रवार, जुलै 16, 2021 5:39 PM
---Advertisement---

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय कसोटी संघात कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्याचे पाहायला मिळाले. भारताचा  युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि थ्रोडाऊन स्पेशालिस्ट दयानंद गरानी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिली आहे. तसेच गरानी यांच्या संपर्कात आल्याने भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण, यष्टीरक्षक वृद्धिमान साहा आणि अभिमन्यू ईश्वरन यांनाही क्वारंटाईन व्हावे लागले आहे. यामुळे, सध्या विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

पंत डेंटिस्टकडे गेल्याने संक्रमित?
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार पंत ८ जुलै रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. तो बीसीसीआयने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर दिलेल्या ३ आठवड्यांच्या सुटीदरम्यान भारतीय संघाच्या हॉटेलमध्ये नव्हता. त्यामुळे, तो ज्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह आढळला, तिथेच तो क्वारंटाईन झाला आहे.

पंत ३ आठवड्यांच्या सुटीदरम्यान त्याच्या मित्रपरिवारासह युरो कप २०२० मधील इंग्लंड विरुद्ध जर्मनीचा सामना पाहाण्यासाठी गेला होता. यावेळी तो विनामास्क सामना पाहात असल्याचे त्याने पोस्ट केलेल्या फोटोमधून दिसत होते. त्यामुळे त्याच्यावर जोरदार टीकाही झाली आहे. तसेच काही चाहत्यांनी आता युरोकपमध्ये विनामास्क सामना बघणे पंतसाठी महागात पडल्याचे म्हटले आहे. मात्र, आता पंत संक्रमित होण्याचे वेगळेच कारण असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

खरंतर कोरोना संक्रमाणाचे स्त्रोत शोधणे कठीण आहे. पण असे म्हटले जात आहे की पंत डेंटिस्टकडे (दातांचे डॉक्टर) गेला होता, तिथेच त्याला कोरोनाचे संक्रमण झाले. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या एका वृत्तानुसार पंत ८ जुलै रोजी कोरोना पॉझिटिव्ह सापडला, त्यापूर्वी तो ५ आणि ६ जुलै रोजी डेंटिस्टकडे गेला होता. याचदरम्यान भारतीय खेळाडू, स्टाफ आणि त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांना कोरोना लसीचा दुसरा डोस दिला गेला.

एका सुत्राने माहिती दिली की ‘पंत ५ आणि ६ जुलै रोजी डेंटिस्टकडे गेला होता आणि तिथेच त्याला संक्रमण झाल्याची शक्यता आहे. त्याला ७ जुलैला लस देण्यात आली होती.’

पंत ८ जुलैपासून क्वारंटाईन आहे. त्यामुळे आता त्याचे आणखी २ कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर तो डरहॅम येथे भारतीय संघात सामील होऊ शकतो.

गांगुलीकडून पंतची पाठराखण 
पंतवर जरी टीका होत असली तरी बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने त्याची पाठराखण केली आहे. त्याने म्हटले आहे की ‘आम्ही इंग्लंडमध्ये युरो कप आणि विम्बल्डन पाहिले आहे. नियम बदलले आहेत (प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी आहे). पंत सुटीवर होता आणि प्रत्येकवेळी मास्क घालणे अशक्य आहे.’

महत्त्वाच्या बातम्या – 

टी२० विश्वचषकात भारत-पाकिस्तान येणार आमने-सामने; आयसीसीकडून संघांची गटवारी जाहीर

‘नगमा अन् दादाच्या अफेरबद्दल सर्वकाही माहितय,’ म्हणत प्रसिद्ध लेखकाकडून बायोपिकची स्टोरी लिहिण्याची इच्छा व्यक्त

भारताच्या श्रीलंका दौऱ्यातील मालिकांच्या तारखांनंतर आता वेळेतही झाला बदल, पाहा किती वाजता सुरु होणार सामने

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---