---Advertisement---

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत हुकले शतक; मग निराश झालेल्या पंतने केले ‘हे’ काम; व्हिडिओ होतोय व्हायरल

On: शनिवार, मार्च 5, 2022 7:46 PM
Rishabh-Pant
---Advertisement---

सध्या भारतीय संघ आणि श्रीलंका संघामध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने शतक झळकवण्याची संधी गमावली आहे.  त्याने या सामन्यात ९६ धावांची शानदार खेळी खेळली आहे. फिरकी गोलंदाजांना आपल्या फलंदाजीने त्रासून सोडणे हे वृत्ती असलेल्या या खेळाडूने ९७ चेंडूंमध्ये ९६ धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने ९ चौकार आणि ६ षटकार लगावल्यानंतर केवळ ४ धावांनी आपले शतक लगावण्याची संधी गमावली आहे. त्याच्या या धडाकेबाज खेळीनंतर त्याचे देशभरातून कौतुक केले जात आहे.

पंतने (Rishabh Pant) संपूर्ण स्टेडियममधील प्रेक्षकांना वेड लावून सोडले आहे परंतु भारताच्या (IND vs SL) डावाच्या ८१ व्या षटकात जो प्रकार घडला त्यानंतर सर्वजण हसायचे थांबले. ८१ व्या षटकात गोलंदाजीसाठी आलेल्या सुरंगा लकमलने पंतला बाद केले. बाद झाल्यानंतर तो खूप जास्त नाराज झाला होता आणि तो खेळपट्टीवरच बसला होता. नंतर त्याने स्वत:ला समजवले आणि तो मैदानातून बाहेर गेला.

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करताना पहिला दिवस समाप्त होईपर्यंत ६ विकेट गमावत ३५७ धावा केल्या होत्या. भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली होती. सलामिवीर रोहित शर्मा आणि मयंक अग्रवालने अर्धशतकीय खेळीची भागीदारी केली. यानंतर तिसऱ्या स्थानावर खेळताना हनुमा विहारीने शानदार अर्धशतक लगावले. तसेच विराट कोहलीसोबत तिसऱ्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी केली. विराट कोहली ४५ धावा करून बाद झाला.

विराटनंतर रिषभ पंतने भारताला धावा करून देण्यात मोठे योगदान दिले. पंतने डावाची सुरुवात हळू केली होती. त्यानंतर त्याने फलंदाजीत शानदार खेळी खेळण्यास सुरुवात केली. रवींद्र जडेजाने ४५ धावा केल्या. आर अश्विनने ६१ धावा केल्या. जयंत यादवने २ धावा केल्या. रवींद्र जडेजाने १७५ धावा करून नाबाद राहिला. दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने ८ गडी गमावत ५७४ धावा केल्या आणि रोहित शर्माने डाव घोषित केला.

महत्त्वाच्या बातम्या-

वॉर्नच्या रूपात आयपीएलला मिळालेला पहिला चॅम्पियन कर्णधार, धोनीच्या सीएसकेला केले होते पराभूत

तू सर्वोत्तम ठरला! पॉंटिंगकडून वॉर्नला भावूक शब्दांत श्रद्धांजली

वॉर्नने गोलंदाजीत अनेक विक्रम केले, पण फलंदाजीतील ‘हा’ दुर्मिळ कारनामाही त्याच्याच नावावर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---