---Advertisement---

रिषभ पंतची धोनीशी बरोबरी! सेंच्युरियननंतर जोहान्सबर्गमध्ये पूर्ण केले ‘हे’ खास शतक

On: बुधवार, जानेवारी 5, 2022 12:21 PM
rishabh-pant-keepimg
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत ( South Africa vs India) या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना (sa vs Ind 2nd test) जोहान्सबर्गच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (४ जानेवारी ) भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिका संघाचा पहिला डाव २२९ धावांवर गुंडाळला. यादरम्यान युवा यष्टिरक्षक रिषभ पंत याच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये या बाबतीत पूर्ण केले शतक 
भारतीय संघाचा युवा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतने (Rishabh pant) वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी मोठा कारनामा केला आहे. रिषभ पंतने शार्दुल ठाकूरच्या (Shardul thakur) गोलंदाजीवर लुंगी एन्गिडीचा झेल टिपताच कसोटी क्रिकेटमध्ये १०० झेल टिपण्याचा पराक्रम केला आहे (100 catches as wicketkeeper). असा कारनामा करणारा तो चौथा भारतीय यष्टिरक्षक ठरला आहे.

यापूर्वी यष्टीमागे एमएस धोनीने २५६ झेल, सैय्यद किरमाणीने १६० झेल आणि किरण मोरेने ११० झेल टिपण्याचा पराक्रम केला होता. तसेच तो कसोटी क्रिकेटमध्ये असा कारनामा करणारा पंत ४२ वा यष्टिरक्षक ठरला आहे.

सेंच्युरियन कसोटीत एमएस धोनीला टाकले होते मागे 
याआधी सेंच्युरियन कसोटीत रिषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये यष्टीमागे १०० बळी घेण्याचा कारनामा केला होता. त्याने हा कारनामा अवघ्या २६ व्या कसोटी सामन्यात केला होता. तर एमएस धोनीने हा कारनामा ३६ व्या कसोटी सामन्यात केला होता. तसेच दक्षिण आफ्रिकेचा माजी यष्टिरक्षक क्विंटन डी कॉक यष्टीमागे सर्वात जलद १०० बळी घेण्याच्या यादीत सर्वोच्च स्थानी आहे. त्याने हा कारनामा अवघ्या २२ व्या सामन्यात केला होता.

या कामगिरीसह रिषभ पंत कसोटी क्रिकेटमध्ये १०० बळी घेणारा ६ वा भारतीय यष्टिरक्षक ठरला होता. त्याच्याआधी एमएस धोनी(Ms Dhoni), सय्यद किरमाणी, किरण मोरे, नयन मोंगिया आणि वृद्धिमान साहा यांनी शतक पूर्ण करण्याचा कारनामा केला आहे. एमएस धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी यष्टिरक्षक आहे. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये २९४ बळींची नोंद आहे.

महत्वाच्या बातम्या :

नेटकऱ्यांनी दिला रहाणेला ‘फेअरवेल’; सोशल मीडियावर व्हायरल होतायेत भन्नाट मीम्स

‘पालघर एक्सप्रेस’ सुसाट! सात बळी मिळवत जोहान्सबर्गमध्ये गाजवली सत्ता

हे नक्की पाहा :

संघाला कठीण परिस्थितीतून सावरणारे ५ गोलंदाज | 5 Memorable Last Overs

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---