भारतीय संघ सध्या टी-20 विश्वचषक 2022 मध्ये जबरदस्त प्रदर्शन करत आहे. भारताने विश्वचषकातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये मोठे विजय मिळवले आहेत. संघ सध्या ग्रुप दोनमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. अस असले तरी, चाहते भारताया युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याला खेळताना पाहण्यासाठी मात्र अजूनही वाट पाहत आहेत. रिषभ पंतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका चाहत्याला त्याला भारतासाठी डावाची सुरुवात कर, असा सल्ला दिल्याचे दिसते.
दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आयपीएल 2022 हंगामानंतर कार्तिकने भारतीय संघात देखील पुनरागमन केले. भारतासाठी त्याने पुनरागमनानंतर काही सामन्यांमध्ये महत्वाची भूमिका पार पाडत विजय मिळवून दिला आहे. याच पार्श्वभूमीवर कार्तिकला टी-20 विश्वचषकासाठी संघात निवडले गेले आणि त्याने रिषभ पंत (RIshabh Pant) याची प्लेइंग इलेव्हनमधील जागा देखील काबीज केली. असे असले तरी, चाहते मात्र पंतला आता भारतीय संघाच्या सलामीवीराच्या रूपात पाहू इच्छित आहेत.
रिषभ पंत नेहमीच त्याच्या चाहत्यांसोबत फोटो घेताना दिसतो. तसेच त्याने अनेकांना गर्दीत जाऊन चाहत्यांना स्वक्षरी देखील दिली आहे. पर्थवर रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी देखील त्याने चाहत्यांना स्वक्षरी दिली. यादरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओत पंतचा एक चाहता म्हणतो की, “भाई, सलामीसाठी ये, भारतीय संघाचे नशीब बदलून टाकशील.” चाहत्याच्या या वक्तव्यानंतर पंत मात्र काहीच बोलला नाही आणि तिथून निघून गेला. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
https://twitter.com/waltairblues/status/1586327729053368320?s=20&t=jchr3suW4n5L40cCNrE49A
सध्या भारतीय संघासाठी कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल सलामीवीराची भूमिका पार पाडत आहेत. रोहितने नेदरलँड्सविरुद्ध अर्धशतकीय खेळी केली, पण राहुल मात्र विश्वचषकातील पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये अपयशी ठरला आहे. पाकिस्तानविरुद्ध 4, तर नेदरलँड्सविरुद्ध राहुलने अवघ्या 9 धावा केल्या. याच पार्श्वभूमीवर अनेकजण राहुलवर निशाणा साधत आहेत. अशातच राहुलला संघातूवन बाहेर करा आणि पंतला सलामीसाठी पाठवा, अशी मागणी देखील चाहत्यांकडून केली जात आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्रो कबड्डी: यु मुंबाचा डिफेन्सच्या जोरावर दमदार विजय; दिल्लीची सलग तिसरी हार
भारतीय फलंदाज वेगवान गोलंदाजांना घाबरतात? प्रशिक्षकांनी दिले ‘असे’ उत्तर