भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-20 सामना गुवाहाटीच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. उभय संघांतील हा सामना रविवारी, 2 सप्टेंबर रोजी खेळला जाईल. तत्पूर्वी संघ याठिकाणी पोहोचले असून खेळाडूंनी सरावाला देखील सुरुवात केली आहे. भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत अलिकडच्या काळात अनेकदा चाहत्यांना वेळ देताना दिसला आहे. गुवाहाटीमध्ये त्याने चाहत्यांसोबत फोटो काढले.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताने 8 विकेट्स राखून विजय मिळवला होता. या विजयानंतर भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडीही घेतली. आता दुसऱ्या सामन्यात जर संघाने विजय मिळवला, तर भारत ही मालिका जिंकेल. पहिल्या टी-20 सामन्यात भारताला सहजासहजी विजय मिळाला असला, तरी दुसऱ्या सामन्यात तसे होईलच असे नाही. दक्षिण आफ्रिका संघ हा सामना जिंकण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल. अशात हा दुसरा टी-20 सामना निर्णायक ठरणार यात काहीच शंका नाही.
या निर्णायक सामन्यापूर्वी स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिषक्ष पंत (Rishabh Pant) चाहत्यांसोबत वेळ घालवताना दिसला. नेहमीप्रमाणेच भारतीय क्रिकेटपटूंना पाहण्यासाठी गुवाहाटीमध्येही चाहत्यांना स्टेडियमबाहेर गर्दी केली होती. अशातच रिषभने थेट या गर्दीत जाऊन चाहत्यांना ऑटोग्राफ दिले आणि त्यांच्यासोबत सेल्फी देखील घेतल्या. दरम्यान रिषभचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकजण त्याचे कौतुक देखील करत आहेत.
Rishabh Pant always finds time to give an autograph and take selfies with cricket fans. pic.twitter.com/IYnPh2ac02
— Johns. (@CricCrazyJohns) October 1, 2022
दरम्यान, मालिकेतील पहिल्या सामन्याचा विचार केला, तर भारतासाठी अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याने जबरदस्त गोलंदाजी केली होती. त्याने या सामन्यात टाकेलल्या चार षटकांमध्ये 4 षटकांमध्ये 32 धावा खर्च करून तीन विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे अर्शदीपने या सर्व विकेट्स डावाच्या दुसऱ्या षटकात घेतल्यामुळे आफ्रिकी संघाची सुरुवात खूपच खराब झाली. त्यांचा संघ 20 षटकांमध्ये अवघ्या 106 धावा करू शकला. प्रत्युत्तरात भारताने विजय मिळवण्यासाठी 16.4 षटके घेतली. यादरम्यान भारताच्या केएल राहुलने 51, तर सूर्यकुमार यादवने 50 धावांची नाबाद खेळी केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
BIG NEWS: जसप्रीत बुमराह संघासोबत ऑस्ट्रेलियाला जाणार नाही! जाणून घ्या भारताचे ‘ट्रॅव्हल प्लॅनिंग’
CPL FINAL 2022: सहा वर्षानंतर जमैका चॅम्पियन, बार्बाडोसचा पराभव करत तिसऱ्यांदा कोरले चषकावर नाव