---Advertisement---

आजपर्यंत कोणत्याच भारतीय यष्टीरक्षकाला दक्षिण आफ्रिकेत न जमलेला विक्रम रिषभ पंतला करण्याची सुवर्णसंधी

On: सोमवार, डिसेंबर 20, 2021 11:49 AM
Rishabh Pant
---Advertisement---

भारतीय संघ २६ डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेसोबत कसोटी मालिका (South Africa vs India Test Series) खेळण्यास सुरुवात करणार आहे. त्यामुळे चाहते, खेळाडू सर्वांमध्ये भरपूर उत्साह आहे. ही कसोटी मालिका आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असल्याने दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे.

तसेच भारतीय संघ अजूनही दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकू शकला नाही. त्यामुळे भारतीय खेळाडूंचं लक्ष्य पहिली कसोटी मालिका जिंकण्यावर आहे. हा दौरा रिषभ पंतसाठी (Rishabh Pant) देखील विशेष बनू शकतो. पंत दक्षिण आफ्रिकेत एक पराक्रम करू शकतो, जो आजपर्यंत कुठल्याच भारतीय यष्टिरक्षकाने केला नाही.

आतापर्यंत कुठल्याच भारतीय यष्टिरक्षकाने दक्षिण आफ्रिकेत शतक ठोकण्याचा पराक्रम केला नाही. त्यामुळे सगळ्यांना आता रिषभ पंतकडून अपेक्षा लागली आहे. कारण पंतने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये शतक झळकावलं आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेत शतकाची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

रिषभ पंतने २०१८ च्या इंग्लंड दौऱ्यात ओव्हल कसोटीत (England vs India Oval Test) शतक ठोकलं होतं. त्याने शतक षटकार मारून साजरं केलं होतं. यामुळेच रिषभ पंत इंग्लंडमध्ये शतक करणारा पहिला यष्टिरक्षक बनला होता. पंतच्या आधी भारतीय यष्टिरक्षक म्हणून महेंद्रसिंग धोनी याची (Mahendra Singh Dhoni) इंग्लंडमधील सर्वाधिक धावसंख्या ९२ होता.

ऑस्ट्रेलियामध्येसुद्धा भारतीय यष्टिरक्षकाने शतक नव्हतं झळकावलं. पण रिषभ पंतने २०१८-१९ च्या दौऱ्यामध्ये शतक झळकावलं. पंतने सिडनी कसोटीत (Australia vs India Sydney Test) शतक साजरं केलं आणि पहिला भारतीय यष्टिरक्षक बनला. याआधी भारताच्या यष्टिरक्षकाची ऑस्ट्रेलियामधील सर्वाधिक धावसंख्या ८९ होती. या धावा माजी यष्टिरक्षक फलंदाज फारुख इंजिनीयर (Farokh Engineer) यांनी ऍडलेड कसोटीत १९६७ मध्ये केल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---