बांगलादेशविरूद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने चमकदार कामगिरीचे प्रदर्शन दाखवत बांगलादेशला 280 धावांनी पराभूत केले. तत्पूर्वी पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने (Rishabh Pant) शानदार शतक झळकावले आहे. अपघातानंर पंतचा हा पहिलाच कसोटी सामना होता. त्यामुळे सामन्यानंतर त्याने आरामदायक वाटल्याचे सांगितले.
रिषभ पंतने (Rishabh Pant) बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी 109 धावांची शानदार शतकी खेळी करून कसोटीमध्ये संस्मरणीय पुनरागमन केले. डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या भीषण कार अपघातात गंभीर दुखापतींमधून बरा झाल्यानंतर पंत पहिलाच कसोटी सामना खेळला. दरम्यान त्याने कसोटी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतले 6वे शतक झळकावले.
रविवारी (22 सप्टेबर) झालेल्या सामन्यानंतर रिषभ पंत म्हणाला, “हे शतक खास आहे कारण मला चेन्नईत खेळायला आवडते. दुखापतीनंतर मला तिन्ही फॉरमॅट खेळायचे होते आणि ही माझी पहिलीच कसोटी होती. आगामी दिवस चांगले जातील अशी आशा आहे.”
पुढे बोलताना पंत म्हणाला, “हे भावनिक होते, मला प्रत्येक सामन्यात धावा करायच्या होत्या, जे घडले नाही. तथापि, मला कसोटीत उत्कृष्ट कामगिरी करायची आहे, कारण मला या फॉरमॅटमध्ये सर्वात सोयीस्कर वाटते. मैदानावर असल्याने मला इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त आनंद होतो.”
दुसऱ्या डावात फलंदाजी करताना रिषभ पंत (Rishabh Pant) आणि शुबमन गिल (Shubman Gill) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने दुसरा डाव 4 गड्यांच्या मोबदल्यात 287 धावांवर घोषित केला आणि बांगलादेशला विजयासाठी 515 धावांचे लक्ष्य दिले. बांगलादेशचा दुसरा डाव 234 धावांवर आटोपल्याने भारताने हा सामना 280 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. आता दोन्ही संघातील दुसरा कसोटी सामना (27 सप्टेबर ते 1 ऑक्टोबर) दरम्यान कानपूर येथे खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाला मिळाले पुजारा-रहाणेचे उत्तराधिकारी! ही जय-वीरूची नवी जोडी करणार कसोटीत धमाल
“कोणीच मला गिफ्ट दिलं नाही, म्हणून…” बांगलादेशविरूद्धच्या विजयानंतरही अश्विन नाराज?
ind vs ban; पराभवानंतरही कर्णधार खूश? नजमुल हुसेन शांतोचा धक्कादायक विधान