भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचा (Rishabh Pant) 2022 मध्ये कार अपघात झाला होता. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. दरम्यान त्याच्या कारलाही आग लागली होती. मात्र, त्याला 2 जणांनी वाचवले. पंत त्या लोकांना विसरला नाही. जीव वाचवणाऱ्या दोघांनाही त्याने खास भेट दिली. पंतने दोघांना स्कूटर भेट दिली. ऑस्ट्रेलियातही याची चर्चा झाली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन मीडियाने देखील रिषभ पंतचे (Rishabh Pant) कौतुक केले.
वास्तविक, रिषभ पंत (Rishabh Pant) एका कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. तो दिल्लीहून घरी परतत असताना त्याच्या कारचा अपघात झाल्यानंतर 2 जणांनी त्याला वाचवले. पंतला गाडीतून बाहेर काढण्यात आले. यानंतर रिषभला रूग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. रिषभने त्याचे प्राण वाचवणाऱ्या दोघांना स्कूटर भेट दिली. पंत सध्या ऑस्ट्रेलियात आहे. सेव्हन प्लस या ऑस्ट्रेलियन वाहिनीने पंतचा व्हिडिओ शेअर केला आहे.
Rishabh Pant gifted two wheeler vehicle to Rajat and Nishu ❤️
Thank you Rajat and Nishu ( They were the first responders on that horrific day ). We are indebted to you.#RishabhPant pic.twitter.com/Zb3Haj75zF— Naman (@Im_naman__) November 23, 2024
कार अपघातानंतर पंत बराच काळ भारतीय संघातून बाहेर राहिला. यासोबतच त्याने आयपीएलचा एक हंगामही सोडला. पंत हा दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) महत्त्वाचा भाग होता. मात्र आता संघाने त्याला सोडले आहे.
सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात पर्थमध्ये कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. पण भारतीय संघ पहिल्या डावात 150 धावांवर ऑलआऊट झाला. पण दुसऱ्या डावात भारताने बिनबाद 172 धावा केल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्ध 218 धावांची आघाडी घेतली आहे. भारताकडून सलामीवीर यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि केएल राहुल (KL Rahul) यांनी 172 धावांची शानदार भागिदारी रचली.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS; उत्कृष्ट खेळीनंतर यशस्वी जयस्वालचा चाहता झाला ‘हा’ दिग्गज खेळाडू!
हार्दिक पांड्याने धमाकेदार अर्धशतक झळकावत संघाला मिळवून दिला शानदार विजय!
जयस्वाल-राहुलच्या शानदार खेळीनंतर ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणाले, “आज खेळपट्टी खूप…”