शुक्रवारपासून (21 फेब्रुवारी) बेसिन रिझर्व (Basin Reserve) येथे न्यूझीलंड विरुद्ध भारत (New Zealand vs India) संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु झाला. आज (23 फेब्रुवारी) या सामन्यातील तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा पहिला डाव 348 धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे त्यांनी पहिल्या डावात 183 धावांची आघाडी घेतली आहे.
तत्पूर्वी काल या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव 165 धावांवरच संपुष्टात आला होता. या डावात न्यूझीलंडकडून टीम साऊथी आणि काईल जेमिसनने प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या. तर ट्रेंट बोल्टने 1 विकेट घेतली. तसेच भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत 19 धावांवर धावबाद झाला.
या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊथीने (Tim Southee) भारताचा फलंदाज रिषभ पंतच्या खेळीबद्दल (Rishabh Pant) आपले मत व्यक्त केले आहे. यावेळी पंतबद्दल बोलताना साऊथी म्हणाला की, पंतचे धावबाद होणे भारताच्या डावाचा टर्निंग पॉईंट होता. ज्यामुळे शनिवारी (22 फेब्रुवारी) वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंड संघ भारतीय संघाला 165 धावांवर सर्वबाद करण्यात यशस्वी ठरले.
पंतने दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या षटकाची सुरुवात षटकाराने केली होती. परंतु तो उपकर्णधार अजिंक्य रहाणेबरोबर भागीदारी करत असताना एकेरी धाव काढण्याच्या नादात झालेल्या गोंधळामुळे धावबाद झाला. त्यामुळे भारताची अवस्था 58.2 षटकात 132 धावांवर 6 विकेट्स अशी झाली होती.
तसेच पंत बाद झाल्यानंतर काही वेळातच रहाणेसुद्धा 46 धावांवर साऊथीच्या गोलंदाजीवर यष्टीमागे झेल देऊन बाद झाला होता.
रहाणेला बाद करण्यासाठी त्याची कोणती रणनीती होती असे विचारले असता साऊथी म्हणाला की, “नाही. आज सकाळी पंतची विकेट सर्वात महत्त्वाची होती. तो एक विस्फोटक फलंदाज आहे. तसेच रहाणेबरोबर तो वेगाने धावा बनवू शकला असता.”
“आम्हाला माहिती होते की जर आम्ही एका बाजूने विकेट्स घेतल्या तर रहाणे आक्रमक होण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे आम्हाला त्याची विकेट घेण्याची संधी मिळेल,” असे रहाणेबद्दल बोलताना साऊथी म्हणाला.
“आम्ही आज सकाळपासून चांगली गोलंदाजी केली आहे. सकाळी दोन विस्फोटक खेळाडूंना बाद करणे आणि अशाप्रकारे डाव लवकर संपवणे खूप चांगले होते,” असेही गोलंदाजीबद्दल बोलताना साऊथी म्हणाला.
…म्हणून मयंक अगरवालची विकेट ठरली टीम साऊथीसाठी अविस्मरणीय https://t.co/uAS9ti5N2v#म #मराठी #cricket #NZvIND
— Maha Sports (@Maha_Sports) February 23, 2020
मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरला तरी विराटने दादाचा 'तो' विक्रम मोडलाच! https://t.co/Q1Gj5bR9cV#म #मराठी #cricket #NZvIND @imVkohli
— Maha Sports (@Maha_Sports) February 23, 2020