---Advertisement---

पंतचा मोठा विक्रम! श्रेयस अय्यरला तर मागे टाकलेच पण यष्टीरक्षक म्हणून धोनी, गिलख्रिस्टलाही ठरला भारी

On: रविवार, एप्रिल 25, 2021 10:43 PM
---Advertisement---

चेन्नई। रविवारी (२५ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामात डबल हेडर सामने खेळवण्यात आले. या दिवसातील दुसरा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. या सामन्यादरम्यान दिल्ली संघाचा कर्णधार रिषभ पंतने खास विक्रम केले आहे.

रिषभ पंतचा खास विक्रम
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीकडून खेळताना रिषभ पंतने २७ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकारासह ३७ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. त्याच्या आता आयपीएलमध्ये दिल्लीकडून खेळताना ७३ सामन्यात ३४.९८ च्या सरासरीने २००४ धावा झाल्या आहेत. त्यामुळे त्याने दिल्लीकडून आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत श्रेयस अय्यरला मागे टाकले आहे.

श्रेयसने दिल्लीकडून आयपीएलमध्ये २२०० धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे सध्या सुरु असलेल्या १४ व्या आयपीएल हंगामात श्रेयस दुखापतीमुळे सहभागी झालेला नाही. त्यामुळे दिल्ली संघाचे नेतृत्व त्याच्याऐवजी रिषभकडे सोपवण्यात आले आहे.

आयपीएलमध्ये दिल्लीकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रिषभ आणि श्रेयस पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर विरेंद्र सेहवाग आहे. सेहवागने २१७४ धावा केल्या आहेत. तर चौथ्या क्रमांकावर शिखर धवन आहे. शिखरने १७३८ धावा केल्या आहेत.

यष्टीरक्षक म्हणूनही विक्रम
रिषभने आयपीएलमध्ये यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळताना २००० धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने यष्टीरक्षक म्हणून ६३ व्या डावात खेळताना हा कारनामा केला असल्याने तो सर्वात जलद २००० आयपीएल धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा यष्टीरक्षक ठरला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर केएल राहुल आहे. त्याने ४७ डावात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून २००० धावा आयपीएलमध्ये पूर्ण केल्या होत्या.

या यादीत ७६ डावांसह रॉबिन उथप्पा तिसऱ्या तर ७७ डावांसह एमएस धोनी चौथ्या क्रमांकावर आहे. तसेच ऍडम गिलख्रिस्ट ७८ डावांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

दिल्लीच्या १५९ धावा
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने २० षटकात ४ बाद १५९ धावा केल्या. त्यांच्याकडून पृथ्वी शॉने ५३ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर रिषभने ३७ आणि स्टिव्ह स्मिथने नाबाद ३४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तसेच शिखर धवनने २८ धावा केल्या. हैदराबादकडून सिद्धार्थ कौलने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तसेच राशिद खानने १ विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या – 

सर जडेजाला तोड नाही! बंगलोरविरुद्धच्या अष्टपैलू कामगिरीने ‘या’ खास यादीत मिळवले स्थान

आयपीएलमध्ये एका षटकात ५ षटकार ठोकणारे ३ फलंदाज; जडेजाआधी यांनी केली आहे कामगिरी

बंगलोरवर सर्वाधिक विजय मिळवण्याच्या यादीत चेन्नईने गाठले अव्वल स्थान, ‘या’ संघाची केली बरोबरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---