---Advertisement---

वयाच्या २४व्या वर्षी कोट्यवधीत पैसे कमावतोय ‘हा’ भारतीय क्रिकेटर, नेटवर्थ ऐकून उडेल झोप

On: गुरूवार, जुलै 7, 2022 12:19 AM
Rohit-Sharma-Rishabh-Pant-Suryakumar-Yadav
---Advertisement---

भारतीय संघाला इंग्लंड दौऱ्यातील एकमात्र कसोटी सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने या सामन्यात जबरदस्त प्रदर्शन केले, पण संघाला विजय मात्र मिळवून देऊ शकला नाही. रिषभ पंतने या सामन्याच्या पहिल्या डावात शतक, तर दुसऱ्या डावात अर्धशतक ठोकले. पंतने त्याच्या प्रदर्शनाच्या जोरावर आता जगभरात प्रसिद्धी मिळवली आहे. भारतीय संघाचा तो नियमित सदस्य असून कोट्यावधी रुपयांचा मालक बनला आहे. पंतचा नेटवर्थ पाहिला, तर तो अनेकांना हैराण करणारा आहे.

कोट्यावधी रुपयांचा मालक आहे रिषभ पंत
रिषभ पंत सध्या फक्त २४ वर्षांचा आहे आणि त्याने भारतीय संघात स्वतःची वेगळी छाप पाडली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच पार पाडलेल्या टी-२० मालिकेत पंत भारतीय संघाचा कर्णधार होता. एवढ्या कमी वयात पंत कोट्यावधी रुपयांचा मालक बनला आहे. माध्यमांतील वृत्तानुसार पंतची एकूण संपत्ती ३९ कोटी रुपये आहे. तसेच पंतचे एकूण नेटवर्थ जवळपास ६६.४२ कोटी रुपयांचे झाले आहे.

महागड्या गाडांच्या शौकीन आहे पंत 
भारताचा हा युवा यष्टीरक्षक फंलदाज महागड्या वाहनांचाही शौकीन आहे. पंतच्या कार कलेक्शनमध्ये एकापेक्षा एक गाड्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा त्या म्हणजे ऑडी ए-८, मर्सिडीज आणि फोर्ड मस्टॅंग यांच्या समावेश आहे. या गाड्यांच्या किमती अनुक्रमे १.८० कोटी, २ कोटी आणि ९५ लाख रुपये आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---