---Advertisement---

अपघातग्रस्त पंतनंतर कोण होणार दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार, ‘या’ खेळाडूंची नावे चर्चेत

Rishabh Pant IPL
---Advertisement---

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याचा शुक्रवारी पहाटे भीषण अपघात झाला. हा अपघात पहाटे 5.30 च्या दरम्यान झाला, ज्यानंतर कारला आग लागली. सध्या त्याला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये त्याचा उपचार सुरू आहे. बीसीसीआयने शुक्रवारी दुपारी एक अधिकारिक घोषमा केली, ज्यामध्ये त्याच्या दुखापतीबद्दल माहिती देण्यात आली. रिषभला डोक्यावर दोन ठिकाणी इजा झाली असून , त्याच्या उजव्या गुडघ्याची लिगामेंट तुटली आहे आणि त्याचे मनगट , कोपर आणि इतर ठिकाणी खरचटले आहे. माध्यमांनुसार पंतला बरे होण्यासाठी 3-6 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे त्याची आयपीएलमध्ये सहभागी होण्याची शक्यता फार कमी आहे.

रिषभ पंत (Rishabh Pant) हा आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार आहे. आयपीएल 2021च्या सुरुवातीला त्याला संघाचे नेतृत्व करण्याची संधी देण्यात आली होती. जर तो वेळेवर फिट झाला नाही, तर अशा परिस्थितीत दिल्ली कॅपिटल्स संघाला नवा कर्णधार आणि नव्या यष्टीरक्षकाचा शोध घ्यावा लागेल. मात्र, दिल्ली संघासाठी एक गोष्ट चांगली आहे की संघामध्ये बरेच खेळाडू आहेत, ज्यांच्याकडे संघाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे.

ऑस्ट्रेलिया संघाचा स्टार सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर (David Warner) याच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट बरोबरच आयपीएलचाही खूप अनुभव आहे. पंतच्या जागी कर्णधारपदाच्या शर्यतीत तो सर्वात पुढे असणार आहे. याआधी त्याने आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व केले आहे आणि संघाला दोनवेळा आयपीएलचा किताबही मिळाला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याच्या कर्णधारपदावर बंदी आणली आहे, पण हा नियम आयपीएलसाठी लागू नाहीये.

वॉर्नरनंतर कर्णधारपदाच्या शर्यतीत भारताच्या अंडर19 विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) हा चांगला दावेदार आहे. 23 वर्षीय या खेळाडूने आतापर्यंत कोणत्याही आयपीएल संघाचे प्रतिनिधित्व केलेले नाही. मात्र, देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने मुंबई संघाचे नेतृत्व यशस्वीरीत्या केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली 2020-21च्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबई संघाने किताब पटकावला होता, तर रणजी ट्रॉफीमध्ये संघ उपविजेता राहिला होता. त्यानंतर कर्णधारपदाच्या शर्यतीत मिशेल मार्श (Mitchell Marsh) आणि मनिष पांडे (Manish Pandey) यांचादेखील समावेश आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गुड बाय 2022 | क्रिकेटच्या मैदानात यावर्षी सर्वाधिक गाजलेले 6 वाद, यादीत दग्गजांचा समावेश
ही कुठली पद्धत? अपघातानंतर पंतचे व्हिडिओ शेअर करणाऱ्यांवर भडकली रोहितची पत्नी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---