चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रविवारी (१० ऑक्टोबर) प्लेऑफचा पहिला सामना पार पडला. दिल्ली संघाने निर्धारित २० षटकात १७२ धावा केल्या होत्या. दिल्लीकडून सलामीवीर पृथ्वी शॉ आणि कर्णधार रिषभ पंत यांनी दमदार अर्धशतक झळकावली. या सामन्यात आपल्या अर्धशतकीय खेळी व्यतिरिक्त अजून एका गोष्टीमुळे चर्चेत आला आहे.
ड्वेन ब्रावो चेन्नईकडून १९ वे षटक टाकत होता. समोर रिषभ फलंदाजी करत होता. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रिषभने जोरदार फटका मारला, चेंडू हवेत स्क्वेअरच्या दिशेने गेला. रिषभने बॅट इतक्या वेगात फिरवली की, त्याच्या हातून ती निसटली. बॅटही उंच जात हवेत गिरक्या घेत जमिनीवर आदळली. त्याचवेळेस हवेत गेलेला चेंडू झेलण्यासाठी दीपक चाहरने प्रयत्न केले, पण तो अयशस्वी ठरला. मात्र, त्याने चौकार अडवला. यावेळी मैदानावरील पंचाने रिषभला बॅट आणून दिली.
🔥PANT'S FLYING!🔥
The #DC captain loses his bat but he's still able to lift his side up to 172-5 with an unbeaten 51💪#CSK need 173 to win and reach the #IPL2021 final🏏#DCvCSK
📺Watch: https://t.co/FFlv51WXdg
📰Scorecard: https://t.co/qrVjjMuDwh pic.twitter.com/qQkukzuRRb— Sky Sports Cricket (@SkyCricket) October 10, 2021
तत्पुर्वी, सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. परंतु धोनीचा निर्णय पृथ्वी शॉने चुकीचा ठरवला. पृथ्वी शॉने पहिल्या षटकापासून आक्रमक पवित्रा स्वीकारला होता. पृथ्वी शॉने ७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ३४ चेंडूत ६० धावा केल्या. मात्र, त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. सुरुवातीचे तीन फलंदाज लवकर बाद झाले. मात्र, मधल्या षटकांमध्ये शिमरॉन हेटमायर आणि रिषभ पंतने डाव सावरला. पंतने अखेरच्या चेंडूपर्यंत झुंज दिली. त्याने ३५ चेंडूत ५१ धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. पृथ्वी शॉ आणि पंतच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर दिल्लीने चेन्नईसमोर १७२ धावांचे आवाहन उभे केले होते.
Rishabh Pant lost the bat this time. pic.twitter.com/jyDNgvH36t
— Tanuj Singh (@ImTanujSingh) October 10, 2021
या पहिल्या प्ले ऑफच्या सामन्यातील विजेता संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल, तर पराभूत संघाला आणखी एक संधी मिळेल, कारण दोन्ही संघांनी साखळी फेरीतील गुणतालिकेत पहिल्या दोन जागा पटकावल्या आहेत. दिल्लीला सलग दुसऱ्यांदा आयपीएलची अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे, तर चेन्नईला पुन्हा एकदा जेतेपदाच्या सामन्यासाठी आपला दावा सिद्ध करायचा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-मैदानात पाऊल ठेवताच आयपीएलमध्ये ‘हा’ कारनामा करणारा धोनी ठरला पहिलाच खेळाडू
-प्रतिस्पर्धी चेन्नई म्हटलं की शॉची बॅट तळपतेच, पाहा खास आकडेवारी
-एक सर्वात युवा, तर एक वयस्कर कर्णधार, पंत-धोनीच्या नावावर पहिल्या क्लालिफायरमध्ये झाले अनोखे विक्रम