भारतीय संघाचा युवा यष्टीरभक फलंदाज रिषभ पंत याच्या पुनरागमनाविषयी महत्वाची बातमी समोर आली आहे. पंत मागच्या जवळपास एक वर्षापासून क्रिकेटच्या मैदानातून बाहेर आहे. डिसेंबर 2022 मध्ये त्याच्या गाडीचा भीषण अपघात झाला होता. अपघातात सुदैवाने बचावल्यानंतर मागच्या 10 महिन्यांमध्ये त्याने चांगल्या प्रकारे फिटनेस मिळवली आहे. लवकरच तो मैदानात पुनरागमन करणार, अशी आनंदाची बातमी चाहत्यांना मिळाली आहे.
इंडियन प्रीमियर लीग (IPL) म्हणजेच आयपीएलच्या आगामी हंगामात रिषभ पंत दिल्ली कॅपिटल्सच्या जर्सीमध्ये दिसू शकतो. दिल्ली कॅपिटल्सचे क्रिकेट संचालक सौरव गांगुली यांनी ही माहिती दिली की, आयपीएल 2024 (IPL 2024) मध्ये रिषभ पंत (Rishabh Pant) खेळताना दिसू शकतो. डिसेंबर 2022च्या शेवटच्या आठवड्यात पंतच्या गाडीचा अपघात झाला होता. नवीन वर्ष घरच्यांसोबत साजरा करण्यासाठी पंत पहाटे दिल्लीवरून त्याचे घरी रुरकीला निघाला. स्वतः गाडी चावत असताना त्याचे पहाटेच्या वेळी त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि हा भीषण अपघात घडला. अपघातात पंतची गाडी जळून खाक झाली. पण सुदैवाने पंत गाडी पेट घेण्याआधी बाहेर पडला होता. स्थानिकांनी वेळीच मदत केल्यामुळे यष्टीरक्षक फलंदाजाला जीव बचावला.
सध्या कोलकातामध्ये दिल्ली कॅपिटल्सचा ट्रेनिंग कॅम्प सुरू आहे. यात रिषभ पंत यानेही भाग घेतला. यावेळी गांगुलींकडून पंतच्या पुनरागमनाविषयी महत्वाची माहिती मिळाली. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत गांगुली म्हणाले, “रिषभ पंत खूप चांगल्या स्थितीत आहे. तो आगामी हंगामात (आयपीएल) पुनरागमन करेल. तो 11 नोव्हेंबरपर्यंत याठिकाणी (कोलकाता) आहे. आम्ही पंतसंदर्भात संघाशी बोललो होतो आणि तोच संघाचा कर्णधार असेल.”
दरम्यान, अपघातानंतर पंतवर काही महत्वाच्या शस्त्रक्रिया पार पडल्या. यातून सावरण्यासाठी आणि स्वतःच्या पायांवर उभे राहण्यासाठी त्याला काही महिन्यांचा वेळ लागला. पण मागच्या काही महिन्यांमध्ये त्याने बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत चांगली फिटनेस मिळवली आहे. आयपीएल 2023 मध्ये पंतच्या अनुपस्थितीमध्ये डेव्हिड वॉर्नर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार होता. पण आगामी हंगामात वॉर्नरकडून कर्णधारपद काढून घेतले जाऊ शकते. (Rishabh Pant may make a comeback from IPL 2024)
महत्वाच्या बातम्या –
कर्णधार बनायला तयार नव्हता रोहित, गांगुलीने ‘ती’ अट घालताच दिला होकार, ‘दादा’चा खुलासा
आजोळच्या घरी पोहोचताच आजीने काढली रचिन रवींद्रची दृष्ट, व्हिडिओ जिंकतोय सर्वांची मने