दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत एका सामन्याच्या बंदीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळू शकला नव्हता. या हंगामात तिसऱ्यांदा स्लो ओव्हर रेट राखल्यामुळे त्याच्यावर ही बंदी घालण्यात आली होती. पंतच्या अनुपस्थितीत, आरसीबीविरुद्ध दिल्लीचा 47 धावांनी पराभव झाला. याचा परिणाम संघाच्या नेट रन रेटवर झाला आहे.
यानंतर दिल्ली कॅपिटल्सनं मंगळवारी लखनऊ सुपर जायंट्सवर विजय मिळवला. या विजयानंतर बोलताना रिषभ पंत म्हणाला की, एका सामन्याच्या बंदीमुळे त्याच्या संघाच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. पंत म्हणाला की, जर तो आरसीबीविरुद्धच्या सामन्यात खेळला असता, तर दिल्लीला जिंकण्याची चांगली संधी मिळाली असती.
दिल्ली कॅपिटल्सचा संघ आता प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतो की नाही, हे इतर सामन्यांच्या निकालांवर अवलंबून असेल. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात खेळू न शकल्यानं पंतनं बीसीसीआयवर आपला राग काढला आहे. मंगळवारी लखनऊ सुपरजायंट्सचा 19 धावांनी पराभव केल्यानंतर त्यानं आपली निराशा व्यक्त केली.
रिषभ पंत म्हणाला, “मी असं म्हणणार नाही की जर मी आरसीबीविरुद्ध सामना खेळलो असतो तर आम्ही जिंकलो असतो. परंतु जर मला शेवटच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली असती, तर आम्ही पात्रता मिळवण्यासाठी चांगल्या स्थितीत असतो. आम्ही मोठ्या अपेक्षेनं हंगामाची सुरुवात केली. अनेक जखमा झाल्या आणि अनेक चढउतार आले. परंतु फ्रँचायझी क्रिकेट असल्यानं तुम्ही नेहमीच तक्रार करू शकत नाही.”
तो पुढे बोलताना म्हणाला की, “काही गोष्टी तुमच्या नियंत्रणात असतात, तर काही गोष्टी नियंत्रणात नसतात. वैयक्तिकरित्या, मैदानावर परतताना मला खूप चांगलं वाटलं. मला देशातून ज्याप्रकारे पाठिंबा मिळत आहे, त्यामुळे मी आनंदी आहे. खूप प्रतिक्षेनंतर मला खेळायला मिळालं.”
अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 विकेट गमावून 208 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, लखनऊ सुपर जायंट्सला 20 षटकांत 9 गडी गमावून 189 धावाच करता आल्या. या विजयासह दिल्ली कॅपिटल्सच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा जिवंत असल्या तरी संघाला आता इतर सामन्यांच्या निकालावर अवलंबून राहावं लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयर्लंडविरुद्ध सलग 3 षटकार मारून बाबर आझमनं केली टीकाकारांची बोलती बंद!
दिल्लीनं उडवला लखनऊचा धुव्वा! केएल राहुलची टीम प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर