पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम 2024 टी20 विश्वचषकापूर्वी चांगल्याच फॉर्ममध्ये दिसत आहे. तो आयर्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत मोहम्मद रिझवानसोबत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज राहिला. या दोघांनीही मालिकेत 132-132 धावा ठोकल्या. आता बाबर आझमनं मालिकेतील तिसऱ्या सामन्यात एका ओव्हरमध्ये चार षटकार मारून सर्व टीकारारांची बोलती बंद केली आहे.
वास्तविक, पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू बासित अली यांनी बाबर आझमला एका ओव्हरमध्ये सलग तीन षटकार मारण्याचं आव्हान दिलं होतं. बाबरनं आयर्लंडविरुद्ध एका ओव्हरमध्ये 4 षटकार लगावले, ज्यापैकी 3 षटकार त्यानं सलग तीन चेंडूवर लगावले. मात्र बाबरनं बासित अली यांचं आव्हान खरंच पूर्ण केलं का? तर याचं उत्तर बहुधा ‘नाही’ असं असेल. कारण बासित अली यांनी बाबरला कोणत्याही आघाडीच्या तीन संघांविरुद्ध सलग 3 षटकार लगावण्याचं आव्हान दिलं होतं.
बासित अली यांनी बाबर आझमला आव्हान देताना म्हटलं होतं की, जर बाबरनं टी20 विश्वचषकात कोणत्याही आघाडीच्या संघाविरुद्ध सलग तीन षटकार ठोकले तर ते त्यांचं यूट्यूब चॅनल बंद करतील. बाबर आझम जर हे आव्हान स्वीकारत असेल तर त्यानं पुढे येऊन सांगावं, असंही ते म्हणाले होते. बासित अली पुढे म्हणाले होते की, जर बाबर असं करू शकला नाही तर त्याला सलामीची जागा सोडावी लागेल. बासित अली यांनी अमेरिका, आयर्लंड आणि युगांडा या देशांचा उल्लेख करून बाबर आझमला त्यांच्याविरुद्ध नाही तर आघाडीच्या संघाविरुद्ध सलग तीन षटकार मारण्याचं आव्हान दिलं होतं.
या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत पाकिस्ताननं आयर्लंडचा 2-1 असा पराभव केला. मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर पाकिस्ताननं दमदार पुनरागमन करत शेवटचे दोन सामने जिंकले आणि मालिका आपल्या खिशात घातली.
महत्त्वाच्या बातम्या –
काय सांगता! सीएसकेचा हा दिग्गज प्रशिक्षक बनू शकतो राहुल द्रविडनंतर टीम इंडियाचा नवा हेड कोच