---Advertisement---

“मी आणि संघ खूप आनंदी आहोत”, बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकून मायदेशी परतलेल्या पंतची पहिली प्रतिक्रिया

On: गुरूवार, जानेवारी 21, 2021 11:37 AM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या ब्रिस्बेन येथील कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवत बॉर्डर-गावसकर मालिका २-१ ने जिंकली आहे. भारताच्या या विजयाचा नायक ठरला तो यष्टिरक्षक ‘रिषभ पंत’. पंतने या सामन्याच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या ३२८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आक्रमक खेळी केली आणि संघाला ३ विकेट्सने सामन्यासह मालिकाही जिंकून दिली.

यानंतर नुकताच (२१ जानेवारी) पंत मायदेशी परतला आहे. दिल्ली विमानतळावरील त्याचा फोटो सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होत आहे. तसेच त्याने भारतात आल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

न्यूज एजन्सी एएनआयशी बोलताना पंत म्हणाला की, “आम्ही पुन्हा एकदा बॉर्डर- गावसकर ट्रॉफी जिंकल्यामुळे मी खूप खुष आहे. याच बरोबर संपूर्ण कसोटी मालिकेत आम्ही ज्याप्रकारे कामगिरी केली, त्यावर माझ्यासह पूर्ण भारतीय संघ आनंदी आहे.”

रिषभ पंतची कसोटी मालिकेतील कामगिरी 

पंतच्या कसोटी मालिकेतील प्रदर्शनाविषयी बोलायचे झाले तर, ऍडलेड येथील पहिल्या कसोटी सामन्यात त्याला भारतीय संघातील अंतिम ११ जणांच्या पथकात स्थान मिळाले नव्हते. त्यानंतर पुढील तीन कसोटी सामन्यातील पाच डावात फलंदाजी करताना त्याने एकूण २७४ धावा केल्या आहेत. यात सिडनी येथील तिसऱ्या कसोटी सामन्यातील ९७ धावांच्या शानदार खेळीचा समावेश आहे. ही त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली.

कसोटी क्रमवारीत मिळवले कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट स्थान

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील कसोटी मालिका संपल्यानंतर आयसीसीने नुकतीच जागतिक कसोटी फलंदाजांची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत पंतने कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट स्थान मिळवले आहे. ६९१ गुणांसह पंत १३व्या स्थानी पोहोचला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“शेवटी आई-वडील हे..” ब्रिस्बेन कसोटीतील गिलचे शतक हुकल्याने वडील नाराज, विरूने दिली प्रतिक्रिया

…म्हणूनच पाकिस्तानचे खेळाडू भारतीय खेळाडूंप्रमाणे यशस्वी होत नाही, दिग्गजाचे मोठे भाष्य

“त्याच्याकडे असाधारण प्रतिभा आहे”, ऑस्ट्रेलियन फलंदाजाने केले रिषभ पंतचे कौतुक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---