भारतीय संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याचा मागील वर्षी 30 डिसेंबरला पहाटे मोठा अपघात झालेला. हा अपघात दिल्ली-डेहराडून महामार्गावर झाला. त्यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला असून, सध्या मुंबई येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताच्या जवळपास 40 दिवसानंतर खोलीच्या बाहेर आलेल्या पंतने एक छायाचित्र पोस्ट करत, आपल्या भावना व्यक्त केल्या.
Good news about Rishabh Pant. pic.twitter.com/ctakrC2xUL
— Johns. (@CricCrazyJohns) February 7, 2023
रिषभच्या अपघातानंतर त्याच्यावर सुरुवातीला डेहराडून येथे उपचार करण्यात आले. त्यानंतर मुंबई येथील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील केली गेली. सध्या तो त्याच ठिकाणी उपचार घेतोय. 40 दिवसानंतर खोली बाहेर आलेल्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करत लिहिले,
‘मला माहित नव्हतं की, सकाळी बाहेर बसून ताज्या हवेत श्वास घेणे किती छान अनुभव असतो.’
यापूर्वी देखील त्याने आपल्या शस्त्रक्रियेनंतर चाहत्यांचे व या कठीण काळात पाठिंबा देणाऱ्या सर्व व्यक्तींचे आभार मानणारे ट्विट केले होते.
रिषभला पुन्हा एकदा दोन्ही पायांवर उभे राहण्याकरता 7-8 आठवड्यांचा अवधी लागू शकतो. परंतु त्याचवेळी त्याला मैदानावर सामन्यासाठी तंदुरुस्त होऊन परतण्यासाठी जवळपास 8-9 महिने लागू शकतात. रिषभ इतक्या मोठ्या कालावधीसाठी संघाबाहेर गेला असल्याने तो अनेक महत्त्वाच्या स्पर्धांना मुकु शकतो. यामध्ये आशिया चषक, आयपीएल व वनडे विश्वचषक यांचा समावेश असेल. 9 जानेवारीपासून सुरू होत असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये भारतीय संघाला त्याची कमतरता नक्कीच जाणवेल.
पंत सध्या भारतीय संघाचा पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक आहे. त्याने आतापर्यंत भारतीय संघासाठी 33 कसोटी, 30 वनडे व 66 टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने अनुक्रमे 2271, 865 व 987 धावा केलेल्या. भारताने इंग्लंडमध्ये मिळवलेल्या वनडे मालिका विजय तसेच ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका विजयामध्ये त्याची भूमिका निर्णायक राहिली होती.
(Rishabh Pant Post Instagram Story After 40 Days Seeing Sun)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हरमन-स्मृतीसह ‘या’ 24 जणी उतरणार सर्वोच्च बेस प्राईसने WPL लिलावात, 409 खेळाडूंची अंतिम यादी जाहीर
पाकिस्तानमध्ये पुन्हा फिक्सिंग! आफ्रिदीवर दोन वर्षांच्या निलंबनाची कारवाई