मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर चालू असलेल्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्याच्या लढतीत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळायला मिळत आहे. पहिल्या डावात १९५ धावांवर गारद झालेला ऑस्ट्रेलिया संघ गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण विभागात चमकदार कामगिरी करत सामना आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करत आहे. तर भारतीय क्रिकेटपटू ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या भेदक माऱ्याचा सामना करत अधिकाधिक धावा करून डाव सावरण्याच्या प्रयत्नात आहेत. दरम्यान भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने नव्या विक्रमाची आपल्या नावे नोंद केली आहे.
भारतीय संघाने ११६ धावांवर ४ विकेट्स गमावल्यानंतर पंत फलंदाजीसाठी मैदानावर उतरला. त्याने ७२.५०च्या स्ट्राईक रेटने ३ चौकार लगावत २९ धावा केल्या. पण ६०व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ऑस्ट्रेलियन गोलंदाज मिचेल स्टार्कने टीम पेनच्या हातून त्याला झेलबाद केले. असे असले तरी, पंतच्या खात्यात मोठ्या विक्रमाची भर पडली आहे.
पंत यजमान ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर सलग ८ डावात २५ किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा पहिला आणि एकमेव भारतीय फलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या मैदानावरील आपल्या मागील डावात त्याने दीडशतकी (१५९ धावा) खेळी केली होती. तर त्यापुर्वीच्या डावात ३३ धावा, ३९ धावा, ३० धावा, ३६ धावा, २८ धावा आणि २५ धावा केल्या होत्या.
पंतव्यतिरिक्त केवळ तीन परदेशी क्रिकेटपटू यजमान ऑस्ट्रेलिया संघाच्या मैदानावर सलग ८ कसोटी डावात २५ पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम करू शकले आहेत. यात वॅली हेमन्ड, रुसी सुर्ती आणि व्हिव्हियन रिचर्डसन यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
वा रे वा….! असे ३ कर्णधार ज्यांनी आयसीसी स्पर्धांमध्ये केली सर्वाधिक शतकं, ‘हा’ भारतीय अव्वल स्थानी
“गिलने दोन वर्षांपुर्वीच कसोटीत पदार्पण करायला हवे होते”, पाहा कुणी केलंय हे वक्तव्य