आयपीएलच्या 17 व्या हंगामाला आज खऱ्या अर्थाने सुरवात झाली आहे. तसेच प्रत्येक सामन्यात वेगळेपण अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे विजयाचं भाकीत करणं वाटतं तितकं सोपं नाही. आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकत पंजाब किंग्सने गोलंदाजीचा निर्णय घेतला. तसेच दिल्ली कॅपिटल्सला 174 धावांवर रोखलं. म्हणून विजयासाठी 175 धावांचं आव्हान मिळालं होतं. पण मोक्याच्या क्षणी झेल सोडल्याने दिल्ली कॅपिटल्सला सामना गमवण्याची वेळ आली आहे. याबाबत दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत याने नेमका सामना कुठे गमावला याबाबत भाष्य केले आहे.
याबरोबरच “खरं सांगायचं तर इशांत शर्माची दुखापत मैदानात स्पष्ट दिसत होती. पण आमच्याकडे एक गोलंदाज शॉर्ट होता. कारण आमची फलंदाजी हवी तशी झाली नाही. त्यामुळे अभिषेक पोरेलला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून उतरावं लागलं. त्याने शेवटच्या षटकात ठोकलेल्या धावांमुळे सामन्यात रंगत आली. पण आमच्याकडे एक बॉलर शॉर्ट होता. असं असलं तरी आमच्या खेळाडूंनी वारंवार सामन्यात आणण्याचा चांगला प्रयत्न केला.”,असं ऋषभ पंतने सांगितलं आहे.
A Walk To Remember 🥹pic.twitter.com/uLhj9jO28q
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 23, 2024
यानंतर पुढे बोलताना ऋषभ पंत म्हणाला आहे की, “पराभवासाठी कारण देणं चुकीचं ठरेल. एक बॉलर शॉर्ट असणं हे काही चांगलं नाही. पण विजयाचं श्रेय पंजाब किंग्सच्या खेळाडूंना द्यावं लागेल.”, असंही ऋषभ पंत पुढे म्हणाला. अभिषेक पोरेलबाबत विचारताच ऋषभ पंत म्हणाला की, “पोरेलचा हा तिसरा की चौथा सामना आहे. ज्या प्रकारे त्याने फलंदाजी केली ती खरंच खास आहे. त्याच्याकडून पुढच्या सामन्यात अपेक्षा असतील.” तसेच “मी क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना थोडा नर्वस होतो. थोडंफार डोक्यावर टेन्शन होतं. पण मी आता खेळाचा आनंद लुटण्यास सुरुवात केली आहे.”, असं ऋषभ पंत पुढे म्हणाला आहे.
A closely fought match but the result goes the other way 💔
All eyes on making a comeback in Jaipur 💪🏽#YehHaiNayiDilli #PBKSvDC #IPL2024 pic.twitter.com/Q6GxDfFWgF
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 23, 2024
दरम्यान, या सामन्यात क्रीडाप्रेमींना उत्सुकता होती ती ऋषभ पंतच्या खेळीची..यासाठी चाहत्यांना आठ षटकं वाट पाहावी लागली होती. तसेच 453 दिवसानंतर ऋषभ पंत मैदानात उतरला. ब्रारच्या नवव्या षटकाच्या दुसरा चेंडू खेळण्याची संधी ऋषभ पंतला मिळाली. पण हा चेंडू निर्धाव गेला आणि तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेत फलंदाजीला सुरुवात केली होती. याबरोबरच ऋषभ पंतने 12 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 18 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
- गुजरातच्या कॅम्पमध्ये आलेली ती महिला कोण? आधी अंगठी घातली अन् केले किस, पाहा व्हिडिओ
- रोमहर्षक सामन्यात पंजाब किंग्जचा दिल्ली कॅपिटल्सवर 4 विकेट्सने विजय