इंडियन प्रीमियर लीग 2023 अवघ्या काही दिवसांमध्ये सुरू होत आहे. आयपीएलचा हा 16वाह हंगाम असणार असून एकूण 10 संघ एकमेकांसमोर असतील. 31 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात जायंट्स यांच्यातील सामन्याने हंगामाची सुरुवात होणार आहे. सालाबादप्रमाणे यावर्षी देखील आयपीएलमधून काही युवा खेळाडूंना प्रसिद्धी मिळताना दिसेल. आपण या लेखात अशा काही खेळाडूंवर नजर टाकणार आहोत, ज्यांनी वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी आयपीएलमध्ये मोठे यश मिळवले होते आणि पुढे आपल्या देशासाठी चमकदार कामगिरी केली.
आयपीएलच्या माध्यमांतून भारताती मोठ्या प्रमाणात युवा खेळाडूंना खेळण्यासाठी मोठे व्यासपीठ मिळाले आहे. यापैकी अनेक खेळाडूंनी या संधीचा पुरेपूर फायदा घेतला आणि आपल्या संघासाठी चमकदार कामगिरी केली. भारतीय संघासाठी चमकदार कामगिरी करणाऱ्या बहुतांश खेळाडूंची निवड ही आयपीएलमधील प्रदर्शन पाहूनच केल्याचे आपल्याला सध्या दिसते. विराट कोहली आणि रोहित शर्मा या दिग्गज भारतीय फलंदाजांसह भारताचे काही खेळाडू असे होते, ज्यांनी वयाच्या 25व्या वर्षी 2000पेक्षा जास्त आयपीएल धावा नावावर केल्या होत्या.
आयपीएलमध्ये वयाच्या 25व्या वर्षी सर्वाधिक धावा करणार्यांची यादी पाहिली, तर यामध्ये रिषभ पंत (Rishabh Pant) सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. पंतने 25व्या वर्षी एकूण 2838 आयपीएल धावा केल्या होत्या. आयपीएलमध्ये 25व्या वर्षी सर्वाधिक धावा करण्याचा मान पटकावणारा पंत आगामी आयपीएल हंगामात मात्र खेळातना दिसणार नाहीये. मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात पंतच्या गाडीचा अपघात झाला, ज्यामध्ये भारताचा हा यष्टीरक्षक फलंदाज दुखापतग्रस्त झाला. मैदानात पुनरागमन करम्यासाठी पंतला अजून मोठा काळ (6 ते 8 महिने) लागणार असल्याचे सांगितले जात आहे.
वयाच्या 25 व्या वर्षी सर्वाधिक आयपीएल धावा करणाऱ्यांमध्ये विराट कोहली (Virat Kohli) दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराट या यादीत 2632 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. यादीत तिसऱ्या क्रमांकावर 2584 धावांसह संजू सॅमसन (Sanju Samson) आहे. चौथ्या क्रमांकावर 2328 धावांसह रोहित शर्मा (Rohit Sharma) आहे. पाचव्या क्रमांकावर 2254 धावांसह सुरेश रैना (Suresh Raina), तर सहाव्या क्रमांकावरील श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) असून त्याच्या नावावर 2200 धावा आहेत.
वयाच्या 25व्या वर्षी सर्वाधिक आयपीएल धावा करणारे खेळाडू
2838 – रिषभ पंत
2632 – विराट कोहली
2584 – संजू सॅमसन
2328 – रोहित शर्मा
2254 – सुरेश रैना
2200 – श्रेयस अय्यर
दरम्यान, आयपीएल मागच्या तीन वर्षांमध्ये कोरोनाच्या कारणास्तव भारताबाहेर खेळवली गेली होती. पण यावर्षी कोरोनाचे सावट दिसत नाहीये आणि आयपीएल पुन्हा एकदा भारतात आयोजित केली गेली आहे. सीएसके आणि भारतीय संघाचा दिग्गज एमएस धोनी याच्यासाठी हा शेवटचा आयपीएल हंगाम असण्याची शक्यता आहे.
(rishabh Pant Scored Most runs in IPL at the age of 25)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: चेन्नईत पाऊल ठेवताच स्टोक्सचा राडा सुरू! नेट्समध्येच लावला षटकारांचा धडाका
धोनीला कोणती गोष्ट बनवते सर्वात वेगळा कर्णधार? खुद्द गावसकरांनी सांगितलंय कारण, जाणून घ्याच