टी20 विश्वचषक 2024 साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. संघाची निवड करताना भारतीय निवडकर्त्यांनी अनेक मोठे निर्णय घेतले. रोहित शर्मासोबत विराट कोहलीलाही संघात स्थान मिळालं आहे. त्याचबरोबर या संघात अशा खेळाडूचाही समावेश करण्यात आलाय, ज्यानं गेल्या 17 महिन्यांत टीम इंडियासाठी एकही सामना खेळलेला नाही. निवड समितीनं मोठा निर्णय घेत या खेळाडूला विश्वचषक संघात स्थान दिलं आहे.
भारतीय निवडकर्त्यांनी रिषभ पंत आणि संजू सॅमसन यांचा टीम इंडियात यष्टीरक्षक म्हणून समावेश केला आहे. रिषभ पंत तब्बल 17 महिन्यांनंतर भारतीय संघात परतला आहे. पंत डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या कार अपघातानंतर टीम इंडियातून बाहेर होता. तो नुकताच आयपीएलमधून क्रिकेटच्या मैदानात परतला असून आता तो टीम इंडियाकडून खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
कार अपघात होण्यापूर्वी रिषभ पंत टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅट खेळत होता. अशा स्थितीत त्याचं पुनरागमन ही टीम इंडियासाठी आनंदाची बातमी आहे.
रिषभ पंतनं भारतीय संघासाठी आतापर्यंत 33 कसोटी, 30 एकदिवसीय आणि 66 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटीत त्यानं 43.67 च्या सरासरीनं 2271 धावा केल्या आहेत. तर एकदिवसीय सामन्यात त्यानं 34.6 च्या सरासरीनं 865 धावा केल्या आहेत. टी20 मध्ये त्यानं 22.43 च्या सरासरीने 987 धावा केल्या आहेत. रिषभ पंत गेल्या टी-20 विश्वचषकातही भारतीय संघाचा भाग होता.
टी20 विश्वचषकासाठी भारतीय टीम – रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
राखीव खेळाडू : शुबमन गिल, रिंकू सिंह, खलिल अहमद, आवेश खान
महत्त्वाच्या बातम्या –
टी20 वर्ल्डकपसाठी ‘कुलचा’ संघात परतले, बुमराह-अर्शदीप-सिराज यांच्याकडे वेगवान माऱ्याची धूरा
आयपीएलच्या संघांना इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा दणका! ‘हे’ खेळाडू प्लेऑफमध्ये खेळू शकणार नाहीत