भारत आणि बांगलादेश यांच्यात चेन्नई येथे कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला. पंतनं जेव्हा हे केलं, तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्याचा आवाज स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर लगेच व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
व्हिडिओमध्ये पंतचा आवाज ऐकू येतोय. पंत म्हणाला, “भाऊ, एक इथे मिडविकेटवर येईल”. त्यावेळी शुबमन गिल स्ट्राईकवर होता. आश्चर्याचं म्हणजे, पंतनं जिथे फिल्डर लावण्याचा इशारा केला, तेथे गोलंदाजानं फिल्डर लावला. या घटनेवर समालोचकांचंही हसू फुटलं. या व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया येत आहेत.
एक यूझर म्हणाला, “पंत वेगळाच व्यक्ती आहे”. दुसरा म्हणाला, “पंतनं बांगलादेशच्या कर्णधाराच काम सोपं केलं”. आणखी एका युझरनं धोनीची आठवण काढली. तो म्हणाला, “धोनीनं विश्वचषकात बांगलादेशविरुद्ध असंच केलं होतं.” येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, धोनीनं 2019 एकदिवसीय विश्वचषकात बांगलादेशची फिल्डिंग सेट केली होती.
Rishabh Pant Setting Bangladesh Field 😭😅
Ms Dhoni In 2019 WC Did The Same Vs Bangladesh 🥸 pic.twitter.com/5hJg4AOPeh
— Rishabhians Planet (@Rishabhians17) September 21, 2024
चेन्नई कसोटीच्या दुसऱ्या डावात रिषभ पंतनं 88 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. आपल्या खेळीत त्यानं 4 चौकार आणि 2 षटकार लगावले. त्यानं पहिल्या डावातही 52 चेंडूत 39 धावांची खेळी खेळली होती. पंत जवळपास दोन वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करतोय. त्यानं डिसेंबर 2022 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर त्याचा भीषण कार अपघात झाला, ज्यामुळे त्याला क्रिकेटपासून दूर राहावं लागलं. त्यानं यावर्षी जूनमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं.
हेही वाचा –
ind vs ban; अश्विनच्या फलंदाजीत एवढा बदल कसा? खुद्द खेळाडूनेच केला खुलासा
वय केवळ आकडा! 35 वर्षीय खेळाडूने हवेत डाईव्ह मारत टिपला अविश्वसनीय झेल – Video
IND vs BAN: हेल्मेटला धागा बांधून शाकिब अल हसन करत होता कसली कृती, व्हिडिओ व्हायरल