रविवारी (दि. 31 मार्च) रोजी झालेल्या सुपर सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने चेन्नई सुपर किंग्ज संघाचा दणदणीत पराभव केला. कर्णधार रिषभ पंतने स्मार्ट कॅपटन्सी करत गुरु एमएस धोनीच्या संघाला मात दिली. दिल्ली कॅपिटल्स संघ ह्या आनंदाचा जल्लोष साजरा करत असतानाच, आता त्यांच्यासाठी एक वाईट बातमी आली आहे. दिल्ली संघाने एवढा चांगला आणि मोठा विजय मिळवूनही त्यांना एका कारवाईला सामोरे जावे लागत आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघाने रविवारी सीएसकेचा 20 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघाने 5 बाद 191 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या संघाला 20 षटकांत 6 बाद 171 धावा करता आल्या. महेंद्रसिंग धोनीने शेवटच्या टप्प्यात तुफान फटकेबाजी करत संघाला विजयाजवळ नेण्याचा प्रयत्न केला. परंतू त्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले आणि रिषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल संघाला विजय प्राप्त झाला. ( Rishabh Pant slapped with fine of INR 12 lakh as Delhi Capitals breach IPL Code of Conduct during win against CSK )
रिषभचा विजय तरीही कारवाई –
रिषभ पंतने संघासाठी चांगली फलंदाजी केलीच, सोबत चांगली कॅपटन्सी करत संघाला विजय मिळवून दिला. परंतू पंतला त्याच्या एका चुकीचा मोठा फटका बसलाय. रिषभ पंतला कर्णधार म्हणून तब्बल 12 लाखांचा दंड ठोठवण्यात आला आहे. सामना सुरु असताना षटकांची गती कमी राखल्याने दिल्ली संघावर ही कारवाई करण्यात आलीये. सामना निर्धारित वेळ संपला नाही आणि दिल्लीची 3 षटके शिल्लक राहिली. त्यामुळे कर्णधार म्हणून रिषभ पंतवर ही कारवाई करण्यात आली आहे.
आयपीएल 2024 मध्ये सामन्यादरम्यान षटकांची गती कमी राखल्याप्रकरणी कारवाई झालेला रिषभ पंत हा दुसरा कर्णधार आहे. याआधी गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार शुबमन गिल याच्यावरही अशीच कारवाई करण्यात आली.
अधिक वाचा –
– अद्भुत, अविश्वसनीय!….बेबी मलिंगानं एका हातानं पकडला ‘कॅच ऑफ द टूर्नामेंट’, पाहा VIDEO
– राशिद खानची गुजरातसाठी मोठी कामगिरी, मोहम्मद शमीचा विक्रम मोडला
– पृथ्वी शॉ इज बॅक! चेन्नईविरुद्ध संधी मिळताच दाखवली आपली ताकद