भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यान रविवारी (१४ मार्च) अहमदाबाद येथे पार पडलेला दुसरा टी२० सामना भारताने ७ विकेट्सने जिंकला. यासह भारताने मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. कर्णधार विराट कोहली आणि पदार्पणवीर इशान किशन विजयाचे शिल्पकार ठरले. दरम्यान यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने मारलेल्या एका उत्तुंग षटकाराने कोहलीलाही भुरळ पाडली आणि त्याने खास अंदाजात पंतची पाठ थोपटली.
झाले असे की, इंग्लंडच्या १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विराट आणि इशान मैदानावर टिकून होते. त्यांच्यातील शतकी भागिदारी पूर्ण होण्यासाठी अवघ्या ६ धावांची आवश्यकता होती. अशात इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशिदने इशानला पायचित करत त्यांची भागिदारी तोडली. त्यानंतर पंत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला.
पंतने आक्रमक पवित्रा घेत मैदानाच्या चारही दिशांना फटकेबाजी करत २६ धावांची छोटेखानी पण महत्त्वपुर्ण खेळी केली. यादरम्यान डावातील १२ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर पंतने जबरदस्त शॉट मारला. त्याचा चेंडू सरळ स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांच्या गर्दीत जाऊन पडला. पंतच्या या ९० मीटर अंतरावर गेलेल्या खणखणीत षटकाराला पाहून नॉन स्ट्राईकर बाजूला उभा असलेला कर्णधार कोहली भलताच खुष झाला. त्याने जाऊन पंतला मिठी मारली आणि शाबासकी दिली.
पंत आणि विराटचा हा अलिंगन देतानाचा फोटो भारतीय क्रिकेटप्रेमींना खूप आवडला आहे. अनेकांनी त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत ‘पिक ऑफ द डे’ करार केले आहे.
Though Rishabh Pant is a good player, but STOP making him hero. There are better wicket keeper Batsman India has….. Why not Ishan kishan? He can become a super HERO if BCCI supports.. https://t.co/OhloB8JokB via @bcci
— Rohit Srivastava (@RohitVicky0925) March 14, 2021
#RishabhPant ❤️#ViratKohli #INDvsENG pic.twitter.com/QiwNwA5aBh
— Devendra Patole (@PatoleDevendra) March 14, 2021
https://twitter.com/gupta_ritikaa/status/1371145288648290305?s=20
दरम्यान सामन्याविषयी बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने निर्धारित २० षटकात ६ बाद १६४ धावा केल्या. यात सलामीवीर जेसन रॉयच्या सर्वाधिक ४६ धावांचा समावेश होता. ३५ चेंडूत २ षटकार आणि ४ चौकार मारत त्याने ही धावसंख्या केली होती. भारताकडून गोलंदाजी करताना वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी २ विकेट्स चटाकवल्या.
प्रत्युत्तरादाखल भारताकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक ७३ धावांची खेळी केली. या खेळीसाठी त्याने ४९ चेंडू खेळले आणि ३ षटकार व ५ चौकार मारले. त्याच्याबरोबर इशान किशननेही ३२ चेंडूत ५२ धावांनी अफलातून खेळी केली. यासह भारताने १७.५ षटकातच ३ विकेट्स गमावत इंग्लंडचे आव्हान पूर्ण केले.
महत्त्वाच्या बातम्या-
केवळ ४ धावांनी अर्धशतक हुकलेल्या जेसन रॉयने ‘असा’ व्यक्त केला राग, पाहा व्हिडिओ
क्या बात अफगानिस्तान! क्रिकेटच्या इतिहासात केवळ ऑस्ट्रेलियालाच जमलेल्या त्या विक्रमाची केली बरोबरी
व्हिडिओ: अन् कोहलीने स्टंपवर काढली भडास, इंग्लंडला ‘असा’ झाला फायदा