---Advertisement---

युवा यष्टीरक्षक रिषभ पंत माजी कर्णधार एमएस धोनीबद्दल म्हणतो…

On: रविवार, जुलै 28, 2019 10:30 AM
---Advertisement---

भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतकडे सध्या भारतीय संघासाठी अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीचा वारसदार म्हणून पाहिले जात आहे. पण धोनीची भारतीय संघात जागा घेणे सोपे नसल्याचे पंतने म्हटले आहे.

हिंदूस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत पंत धोनीबद्दल म्हणाला, ‘मला माहित आहे त्याची जागा घेणे सोपे नाही. पण जर मी याविषयी विचार करायला लागलो तर माझ्यासाठी समस्या निर्माण होईल. सध्या मी लोक काय म्हणत आहेत याचा विचार करत नाही. मी फक्त मला काय करायचे आहे यावर लक्ष केंद्रित करत आहे.’

‘मला माझ्या देशासाठी चांगली कामगिरी करायची आहे. या एकाच गोष्टीवर माझे लक्ष केंद्रित आहे. मी आव्हान सकारात्मकतेने घेतो. सध्या मला काय शिकायचे आहे आणि कशात सुधारणा करायची आहे, यावर लक्ष द्यायचे आहे.’

त्याचबरोबर पंत धोनीमधील आत्मसात करण्यासारख्या कौशल्यांबद्दल म्हणाला, ‘तो ज्याप्रकारे खेळाला समजतो, ती पहिली गोष्ट. नंतर तो दबावाच्या परिस्थिततही शांत असतो. त्याच्याकडून शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. मैदानाबाहेर तो खूप मदतही करतो. मी माझ्या वरिष्ठ खेळाडूंकडून नेहमीच शिकत राहण्याकडे लक्ष देतो.’

पंत यापुढे भारतीय संघासाठी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून पहिली पसंती असणार असल्याचे निवड समीती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे. भारतीय संघ पुढिल महिन्यात करणार असलेल्या विंडीज दौऱ्यातील तिन्ही प्रकारच्या क्रिकेट मालिकांसाठी भारतीय संघात पंतला संधी मिळाली आहे. या मालिकेसाठी धोनी अनुपलब्ध असणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

वनडेतून निवृत्ती घेतल्यानंतर मलिंगाला सचिन तेंडुलकर, जसप्रीत बुमराहने दिल्या अशा शुभेच्छा

प्रो कबड्डीच्या या सामन्यासाठी विराट कोहलीची खास उपस्थिती

पहिल्या ऍशेस सामन्यासाठी असा आहे इंग्लंडचा संघ; या खेळाडूला मिळाली पहिल्यांदाच संधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment