दिल्लीचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने भारतीय संघाचा माजी प्रशिक्षक राहुल द्रविड आणि सध्याचा प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या शैलीबद्दल खुलेपणाने भाष्य केले आहे. द्रविडच्या नेतृत्वाखाली भारताने खूप यश मिळवले. भारतीय संघाने 2024 चा टी20 विश्वचषक जिंकून 11 वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. द्रविडच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघ 2023 जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचला आणि त्यासोबतच 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीतही पोहोचला. मात्र दोन्ही वेळा संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला.
एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीतील पराभवानंतर बीसीसीआयने राहुल द्रविडला एक वर्षाची मुदतवाढ दिली होती. यानंतर राहुल द्रविडच्या मार्गदर्शनखाली टीम इंडियाने आयसीसी टी20 विश्वचषक फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला नमवून ट्राॅफी उंचावली. राहुल द्रविडचा कार्यकाळ संपल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गौतम गंभीरची टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती केली. गंभीरच्या कोचिंगमध्ये भारताने श्रीलंकेचा टी20 मालिकेत पराभव केला आणि त्यानंतर एकदिवसीय मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. गंभीरचा कार्यकाळ डिसेंबर 2027 पर्यंत आहे.
पंतने दोन्ही प्रशिक्षकांसोबत वेळ घालवला आहे. दुलीप ट्रॉफी 2024 सामना सुरू होण्यापूर्वी रिषभ पंत जिओ सिनेमावर बोलला. तो भारत ब संघाचा एक भाग आहे. पंत म्हणाला की, राहुल द्रविड आणि गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शमाची शैली खूपच वेगळी आहे. तो म्हणाला की द्रविड खूप संतुलित आहे पण गाैती भाई अधिक आक्रमक आहे. पंत पुढे म्हणाला की, भारताचा नवनियुक्त प्रशिक्षक गंभीर फक्त जिंकण्यावर अधिक लक्ष केंद्रित करतो. पण यश मिळवण्यासाठी संतुलित दृष्टीकोन अंगीकारण्यावर तो भर देतो.
पंत म्हणाला, ‘मला वाटते राहुल भाई एक व्यक्ती आणि प्रशिक्षक म्हणून खूप नम्र होते. हे चांगले किंवा वाईट दोन्ही असू शकते. यात सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजू आहेत. आपण कुठे लक्ष केंद्रित करू इच्छिता यावर ते अवलंबून आहे. तर गौतम भाई अधिक आक्रमक. तुम्हाला जिंकायचे आहे यावर तो खूप जोर देतो.
रिषभ पंत गुरुवारी लाल चेंडूच्या (कसोटी) क्रिकेटमध्ये परतला. बऱ्याच दिवसांनी तो या फॉरमॅटमध्ये खेळत होता. मात्र, 5 सप्टेंबर रोजी दुलीप ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी पंतचे पुनरागमन संस्मरणीय नव्हते. सामन्याच्या पहिल्या दिवशी केवळ सात धावा करून तो बाद झाला. त्याला आकाश दीपने बाद केले. दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीनंतर जर निवड झाल्यास पंत बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसणार आहे.
हेही वाचा-
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक सामनावीर
Duleep Trophy; हर्षितचं सिग्नेचर स्टाईल सेलिब्रेशन पुन्हा भोवणार? चाहत्यांचा आक्रोश!
Paralympics 2024; नवव्या दिवशी भारताच्या खात्यात येऊ शकतात 5 पदके, या खेळातून आशा