इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यात वनडे मालिका पार पडली आहे. भारताने शेवटच्या सामन्यात ५ विकेट्सने विजय मिळवत मालिका २-१ अशी जिंकली आहे. ओल्ड ट्रॅफोर्ड, मॅनचेस्टरवर झालेल्या या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतने नाबाद शतकी खेळी केली. त्याने शतकानंतर पवेलियनकडे थम्स अप असा इशारा केला. त्याने नक्की असे का केले हे व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून समोर आले आहे.
या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी यजमान संघ ४५.५ षटकातच सर्वबाद झाला. त्यांनी भारतासमोर विजयासाठी २६० धावांचे लक्ष्य ठेवले. भारतीय संघाने हे लक्ष्य ४२.१ षटकात ५ विकेट्स गमावत पूर्ण केले. यावेळी पंतने ११३ चेंडूत १६ चौकार आणि २ षटकार मारत नाबाद १२५ धावा केल्या. त्याचे हे वनडेतील पहिलेच शतक ठरले.
रिषभ पंत (Rishabh Pant) जेव्हा फलंदाजीसाठी उतरला तेव्हा भारत ४ बाद ७२ धावा अशा कठीण परिस्थितीत होता. यावेळी त्याला अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने योग्य साथ दिली आहे. त्या दोघांनी पाचव्या विकेटसाठी १३३ धावांची भागीदारी केली. हार्दिकने ७१ धावा केल्या आहेत.
पंतने शतक झाल्यानंतर स्टॅंड्सच्या दिशेने इशारा केला. तो असा रोहितसाठी करत होता हे दिसून आले. रोहितनेही त्याला हसत थम्स अपचा इशारा केला आहे. भारताने ही मालिका जिंकत इतिहास रचला. तर रोहित हा इंग्लंडमध्ये वनडे मालिका जिंकणारा तिसरा भारतीय कर्णधार ठरला. तसेच यजमान संघाने टी२० मालिकाही १-२ने गमावली आहे.
https://twitter.com/maheshspawar1/status/1548720523609513984?s=20&t=MxRyY4hFS5GVYIzKja5GzQ
या सामन्यात जसप्रीत बुमराह ऐवजी संघात आलेल्या मोहम्मद सिराजने त्याच्या पहिल्याच षटकात एकही धाव न देता २ विकेट्स घेतल्या. त्याने जॉनी बेयरस्टो आणि जो रुट यांना बाद करत यजमान संघाला सुरूवातीला धक्के दिले. हार्दिकनेही ७ षटकात २४ धावा देत ४ विकेट्स घेण्याची कमागिरी केली. त्याची ही वनडेतील सर्वोत्तम कामगिरी ठरली. तसेच युझवेंद्र चहलने देखील ३ विकेट्स घेतल्या.
पंतने आतापर्यंत २७ वनडे सामने खेळले असून त्यामध्ये ३६.५२च्या सरासरीने ८४० धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी संघात निवड झाली असून पाच सामन्यांच्या टी२० मालिकांमध्ये तो खेळणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंड दौऱ्यातील पाच पराक्रम, जे टीम इंडियाला बनवतील टी-२० वर्ल्ड कप चॅम्पियन
‘या’ खेळाडूने शूटींग खेळाच्या विश्वचषकात फडकावला तिंरगा, सुवर्णपदक जिंकताच केला मोठा विक्रम
काय सांगता, बेन स्टोक्सला झाली होती अटक! नक्की काय आहे प्रकरण