सध्या भारतीय संघ ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. यादरम्यान शमीने शुक्रवारी (३ सप्टेंबर) आपला ३१ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी शमीला जगभरातून त्याच्या चाहत्यांकडून तसेच तमाम क्रिकेट हस्तींकडून शुभेच्छा मिळाल्या. तसेच भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतने देखील शमीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. परंतु, पंतची ही शुभेच्छा जरा हटके स्वरूपाची होती.
पंतने शमीची चेष्टा करत त्याला शुभेच्छा दिल्या. यावर सर्व चाहत्यांनी मजा देखील घेतली होती. मात्र आता शमीने देखील पंतच्या या शुभेच्छांना तोडीस तोड असे उत्तर दिले आहे. सध्या हे दोघेही इंग्लंड दौऱ्यावर आहेत.
शमीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना पंतने ट्विट करत लिहिले होते की, “शमी भाई केस (डोक्याची केस) आणि वय दोन्ही खूप पटापट निघून चालले आहे. जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”
शमीने देखील यावर पंतची फिरकी घेत उत्तर दिले. यावर शमीने लिहिले. “माझाही दिवस येईल बेटा, केस आणि वय याला जाण्यापासून कोण रोखू शकत नाही. मात्र, आजही स्थूलपणावर (जाडी) इलाज केला जातो.” पंतच्या जाडीवर मस्करी करत शमीने असे उत्तर दिले. सध्या शमीचे ट्विट प्रचंड व्हायरल होत आहे.
Apna time aayega beta ball or Umar ko koi nahi rook saka but motape ka treatment aaj bhi hota hai @RishabhPant17 🏃🏽♂️ 🏃🏽♂️🏃🏽♂️🏃🏽♂️😄😄😄😄😄 https://t.co/AddyqeleGt
— 𝕸𝖔𝖍𝖆𝖒𝖒𝖆𝖉 𝖘𝖍𝖆𝖒𝖎 (@MdShami11) September 4, 2021
दरम्यान, इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात चौथा कसोटी सामना गुरुवारपासून (२ सप्टेंबर) सुरू झाला आहे. यातील पहिल्या डावात भारतीय संघाची खराब सुरवात झाली होती. त्यामुळे भारतीय संघ दुसऱ्या डावात ९९ धावांनी पिछाडीवर पडला होता. मात्र, या नंतर दुसऱ्या डावाची सुरुवात भारतीय संघाने चांगली केली. यादरम्यान सलामीचा फलंदाज केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी ८३ धावा जोडल्या. यानंतर रोहित आणि पुजारा यांनी देखील भारतीय संघाचा डाव सावरत दिडशतकी भागीदारी केली.
यादरम्यान रोहितने १२७ धावांची शानदार शतकी खेळी देखील केली. त्याच्या सोबतीने पुजाराने देखील ६१ धावांची खेळी केली. मात्र नंतर दोघेही आली रोबिन्सनच्या गोलंदाजीवर एकामागे एक बाद झाले. तिसऱ्या दिवसानंतर भारतीय संघाची स्थिती ३ गडी गमावून २७० धावा अशी होती. भारतीय संघाने १७१ धावांची आघाडी मिळवली आहे.
महत्वाच्या बातम्या –
–रोहितच्या ‘हिट शो’ पुढे अँडरसन बेजार, चौकार गेल्यानंतर असा व्यक्त केला राग; तुम्हीही पाहा
–लग्नापूर्वी संजनाला गर्विष्ठ समजायचा बुमराह, मग ‘अशी’ सुरू झाली त्यांची ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’
–बिग ब्रेकिंग! भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक शास्त्री कोरोना पॉझिटिव्ह, इतर ३ सदस्यही विलगीकरणात