भारतीय क्रिकेट संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत २-२ ने बरोबरीच्या निकालावर समाधान मानावे लागले आहे. या मालिकेत पाहुणा दक्षिण आफ्रिका संघ सुरुवातीला २-० ने आघाडीवर होता. मात्र त्यानंतर भारतीय संघाने दमदार पुनरागमन केले आणि मालिका २-२ ने बरोबरीत आणली. त्यामुळे पाचवा टी२० सामना मालिकेचा निकाल लागण्याच्या दृष्टीने निर्णायक होता. परंतु हाच सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. दरम्यान नाणेफेकीच्या बाबतीत भारताचा प्रभारी कर्णधार रिषभ पंत भाग्यवान राहिला नाही.
पंत (Rishabh Pant) डाव्या हाताने फलंदाजी करतो, मात्र उजव्या हाताने नाणेफेक (Toss) करतो. राजकोटमधील चौथ्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर पंतने मजेत म्हटले होते की, तो इथून पुढे डाव्या हातानेच नाणेफेकही करेल. परंतु बेंगलोरमध्ये झालेल्या पाचव्या टी२० सामन्यातही नाणे उसळताना त्याने उजव्या हाताचाच वापर केला होता. या सामन्यातही नाणेफेकीचा कौल त्याच्या बाजूने लागला नव्हता.
अशाप्रकारे त्याने या मालिकेतील पाचही सामन्यांमध्ये नाणेफेक गमावली. यासह नकोशी कामगिरी त्याने आपल्या नावावर केली आहे. यासह कारकिर्दीतील सुरुवातीच्या ५ सामन्यांच्या टी२० मालिकांमध्ये सर्वच्या सर्व सामन्यांत नाणेफेक गमावणारा (Rishabh Pant Lost Toss In Consecutive 5 T20I) जगातील पहिलाच कर्णधार बनला आहे.
दरम्यान भारतीय संघाचे भारतभूमीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्याचे स्वप्न पुन्हा एकदा अपुरेच राहिले आहे. या मालिकेपूर्वी २ वेळा दक्षिण आफ्रिका संघाने भारतात टी२० मालिका खेळली होत्या. या मालिकांमध्ये एकदा धोनी भारतीय संघाचे नेतृत्त्व करत होता, तर दुसऱ्यावेळी विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार होता. या दोन्हीही मालिका भारतीय संघाला जिंकता आल्या नव्हत्या.
वर्ष २०१५ मध्ये झालेली टी२० मालिका दक्षिण आफ्रिकेने २-० ने जिंकली होती. या मालिकेतील १ सामना पावसामुळे होऊ शकला नव्हता. तसेच २०१९ मध्ये विराटच्या नेतृत्त्वातील भारतीय संघाने टी२० मालिका १-१ नो बरोबरीत राखली होती. या मालिकेतही एक सामना होऊ शकला नव्हता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
विचारही केला नव्हता, ८ महिन्यांत ६ कर्णधारांसोबत काम करावे लागेल; द्रविडने सांगितला अनुभव
अनुभवी भुवनेश्वरने ‘मालिकावीर’ बनत रचला इतिहास; ठरला पहिलाच भारतीय वेगवान गोलंदाज
ऑस्ट्रेलियाचा दिग्गजही धोनीचा ‘जबरा फॅन!’, सोशल मीडियावर शेअर केली अभिमानास्पद पोस्ट