भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज कसोटी क्रिकेटमध्ये नेहमीच चांगले प्रदर्शन करत आला आहे. टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटच्या तुलनेत कसोटी क्रिकेटमध्ये तो अधिक चांगला खेळला आहे. इंग्लंडविरुद्ध सध्या बर्मिंघम येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यातही पंतने शतक ठोकले. या सामन्यात खासकरून इंग्लंडच्या वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला पंतमुळे अडचणींचा सामोरे जावे लागले.
इंग्लंडचा ३९ वर्षीय वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) भारताविरुद्ध सध्या सुरू असलेल्या कसोटी सामन्यात देखील पूर्ण लयीत दिसत होता. बर्मिंघम कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताच्या वरच्या फळीतील फलंदाज स्वस्तात बाद झाले. पहिल्या चार विकेट्स संघाची धावसंख्या ७१ असताना पडल्या. परंतु त्यानंतर रिषभ पंत (Rishabh Pant) आणि रवींद्र जडेजाने सहाव्या विकेटसाठी २२२ धावांची भागीदारी केली. शतकी खेळीदरम्यान पंतने अँडरसनचा घाम काढला.
शुबमन गील, चेतेश्वर पुजार आणि श्रेयस अय्यर या महत्वाच्या विकेट्स अँडरसनने घेतल्या. पण पंत खेळपट्टीवर आल्यानंतर अँडरसन देखील फिका पडला. त्याने टाकलेल्या २८ व्या षटकतात पंतने एक जबरदस्त स्ट्रेट ड्राईव्ह चौकार मारला. या शॉटनंतर अँडरसनच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. खेळपट्टीवर पंत आणि अँडरसन यांच्या वेळी काहीतरी बोलनेही झाले, ज्यानंतर दोघांच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळाले.
मागच्या वर्षी जेव्हा इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर आला होता, तेव्हा अहमदाबाद कसोटीत पंतने अँडसरनला रिवर्स स्वीप षटकार मारला होता. पंतच्या त्या षटकाराची देखील खूप चर्चा झाली होती. पंतपुढे अँडरसन अपयशी ठरला असला, तरी त्याने या कसोटी सामन्यात स्वतःच्या संघासाठी सर्वोत्तम गोलंदाजी केली. सामन्याच्या पहिल्य डावात २१.५ षटके गोलंदाजी केली आणि यामध्ये ६० धावा खर्च करून ५ महत्वाच्या विकेट्स घेतल्या. भारतासाठी यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने १११ चेंडूत सर्वाधिक १४६ धावा केल्या. तसेच अष्टपैलू रवींद्र जडेजाने १९४ चेंडूत महत्वाच्या १०४ धावांचे योगदान दिले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
बुमराहचे धमाकेदार प्रदर्शन पाहून ब्रॉडला नव्हता बसत विश्वास, पाहा कशी होती रिएक्शन
Video: जडेजाने शतक ठोकताच विराटही झाला भलताच खूष, रिऍक्शन पाहून तुम्हीही कराल प्रशंसा
Video: ‘कॅप्टन’ बुमराहच्या रुद्रावतारावर विराटही झाला फिदा, डगआऊटमध्ये पोहोचताच केले असे काही