भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या बॉर्डर गावसकर मालिकेत, भारतीय संघाने 2-1 अशा फरकाने मालिका जिंकून भारतीय संघ मायदेशात परतला आहे. भारतीय संघाचे मायदेशात गुरुवारी आगमन झाले. त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध दोन सामन्यात महत्वपूर्ण खेळी करणारा रिषभ पंत म्हणाला, “माझी तुलना धोनी सोबत करू नका.”
भारतीय संघाचा डावखुरा फलंदाज रिषभ गुरुवारी आपल्या भारतीय संघतील खेळाडू सोबत भारतात आला. त्यांनंतर दिल्ली येथील पत्रकार परिषदेत म्हणाला की त्याची इतर खेळाडूंशी तुलना केली जावे असे त्याला वाटत नाही. त्याला भारतीय क्रिकेटमध्ये स्वत:ची ओळख बनवायची आहे. त्याने ऑस्ट्रेलिया झालेल्या बॉर्डर गावसकर मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यात महत्वपूर्ण खेळी साकारताना भारतीय संघासाठी योगदान दिले होते.
रिषभ पंत म्हणाला धोनी सारख्या महान खेळाडूसोबत त्याची तुलना केल्याचा आनंद होतो. परंतु त्याला स्वत:ची ओळख निर्माण करायची आहे. नेहमी भारतीय संघाला दोन विश्वचषक मिळवून देणार्या माजी कर्णधार धोनी सोबत त्याची तुलना केली जाते. या डावखुर्या यष्टीरक्षक खेळाडूंने ब्रिस्बेन येथे झालेल्या कसोटी सामन्यात 89 धावांची नाबाद खेळी करून भारताला विजय मिळवून दिला होता. त्याचबरोबर सिडनीत खेळल्या गेलेल्या तिसर्या सामन्यात सुद्धा त्याने 97 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली होती. तो सामना अनिर्णीत राहिला होता.
रिषभ पंत पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाला, “तुमची तुलना जेव्हा धोनी सारख्या खेळाडूसोबत केली जाते, तेव्हा खूप चांगले वाटते.” त्याचबरोबर 23 वर्षीय रिषभ पंत म्हणाला, “हे खूप चांगले आहे, पण मला नाही वाटत माझी तुलना कोणाशी केली जावी. मला भारतीय क्रिकेट मध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करायची आहे. तसे ही कोणत्या युवा खेळाडूंची तुलना दिग्गज खेळाडू सोबत करणे योग्य नाही.”
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेत पहिल्या सामन्यात पराभव झाल्याने पिछाडीवर होता. मात्र भारतीय संघाने उर्वरित तीन सामन्यात दमदार कामगिरी केली. त्यामुळे भारतीय संघाने सलग दुसर्यांदा बॉर्डर गावसकर मालिकेत विजय मिळवला. त्यामुळे भारतीय युवा खेळाडूंचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
म्हणून माझ्या मनात मोहम्मद सिराज बद्दल सन्मान आहे, ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराचे वक्तव्य
भारतीय संघातील पुजाराचे महत्व अनन्यसाधारण, ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने केले कौतुक
व्हिडिओ: धाव घेताना फलंदाजाची गोलंदाजांशी घातक टक्कर, त्यानंतर घडलं असं काही की तुम्ही कराल कौतुक