सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत दुखापतग्रस्त झाला आहे. त्याला भारताच्या पहिल्या डावातील ८५ व्या षटकात हाताच्या कोपराला पॅट कमिन्सचा चेंडू जोरदार लागला आहे. त्यामुळे त्याला शनिवारी (९ जानेवारी) हॉस्पिटलमध्ये स्कॅनसाठी घेऊन जाण्यात आले आहे.
शनिवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पंत ३४ धावांवर खेळत असताना त्याच्या डाव्या हाताच्या कोपराला कमिन्सने १४१ ताशी किमोमीटर वेगाने टाकलेला चेंडू लागला. त्यामुळे तो वेदनेने कळवळत होता. त्यावेळी लगचेच काहीवेळासाठी भारताचा मेडिकल स्टाफ मैदानावर आला होता. पण पंतने उपचार घेतल्यानंतर खेळणे कायम ठेवले. परंतु, तो काहीवेळातच ३६ धावांवर बाद झाला.
भारताचा डाव २४४ धावांवर संपल्यानंतर त्याला स्कॅनसाठी घेऊन जाण्यात आले आहे. याबाबत बीसीसीआयने ट्विटरवरुन माहिती दिली आहे.
Rishabh Pant was hit on the left elbow while batting in the second session on Saturday. He has been taken for scans. #AUSvIND pic.twitter.com/NrUPgjAp2c
— BCCI (@BCCI) January 9, 2021
त्यामुळे सध्या ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात त्याच्याऐवजी वृद्धिमान साहा यष्टीरक्षण करण्यासाठी आला आहे.
भारताचे दुखापतग्रस्त खेळाडू –
चालू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातत रिषभ पंत दुखापतग्रस्त होणारा पहिला भारतीय खेळाडू नाही. त्याच्याआधी मोहम्मद शमी, उमेश यादव आणि केएल राहुल हे तिघेही दुखापतीमुळे या दौऱ्यातील कसोटी मालिकेतून बाहेर पडले आहे. शमीला पहिल्या कसोटीत, उमेशला दुसऱ्या कसोटीत दुखापत झाली. तर केएल राहुलला सरावादरम्यान दुखापत झाली.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२१: धोनी ठरणार १५० कोटी कमावणारा पहिला क्रिकेटर, घ्या जाणून रोहित-विराटची कमाई
“सेंचूरी नंतरची परंपरा…”, सिडनी कसोटीतील धडाकेबाज शतकानंतर स्मिथचं पत्नीसोबत हटके सेलिब्रेशन
इंस्टाग्रामवरही धोनीचा जलवा! विराटनंतर ‘हा’ रेकॉर्ड करणारा दुसराच