येत्या १९ सप्टेंबर पासून युएईमध्ये आयपीएल २०२१ स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांचा थरार पहायला मिळणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघ कसून सराव करत आहेत. तसेच मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ युएईला रवाना देखील झाले आहेत. दरम्यान, दिल्लीचा माजी कर्णधार श्रेयस अय्यर देखील मैदानात घाम गाळताना दिसून येत आहे. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला असेल की, दिल्ली कॅपिटल्स संघाची धुरा कोणाच्या हाती देण्यात येईल. आता याचा खुलासा करण्यात आला आहे.
यावर्षी इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना श्रेयस अय्यरला खांद्याची दुखापत झाली होती. ज्यामुळे त्याला क्रिकेटपासून दूर राहावे लागले होते. तसेच त्याला आयपीएल २०२१ स्पर्धेत देखील सहभागी होता आले नव्हते. परंतु, आता तो फिट झाला असून त्याने यूएईमध्ये सरावाला सुरुवात केली आहे. त्यामुळे असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, तो रिषभ पंत ऐवजी दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करणार.
परंतु, स्पोर्ट्सकिडातील वृत्तानुसार, फ्रेंचाइजीसोबत जोडलेल्या एका सूत्राने सांगितले की, “ही दिल्ली कॅपिटल्स संघासाठी आनंदाची बातमी आहे की, श्रेयस अय्यर फिट आहे आणि तो मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहे. परंतु, असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, दिल्ली कॅपिटल्स संघाचे संघ व्यवस्थापक त्याला फिट होण्यासाठी आणखी वेळ देणार आहेत. ज्यामुळे रिषभ पंतच दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करताना दिसून येऊ शकतो. परंतु, हे फक्त आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मर्यादित असेल.”(Rishabh pant will continue as the captain in ipl 2021 reports)
श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत रिषभ पंतला दिल्ली कॅपिटल्स संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. ही जबाबदारी त्याने चोख पार पडली होती. त्याला पृथ्वी शॉ,शिखर धवन, रबाडा आणि स्टॉइनिस या खेळाडूंनी चांगली साथ दिली होती. स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर होता. दिल्लीने ८ सामने खेळले होते. ज्यामध्ये त्यांना ६ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले होते. आगामी स्पर्धेसाठी संघातील खेळाडू जोरदार सराव करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
जो रूट अँड कंपनीने लॉर्ड्सच्या पराभवातून घेतला धडा, ‘ही’ चूक सुधारत लीड्समध्ये भारताला केले पराभूत
ओ शेठ! मेस्सी रोनाल्डोच्या फॅनची अफलातून रिल्स, लाखो व्हूव्जचा पडतोय पाऊस
चाळीस वर्षीय पाकिस्तानी खेळाडूची सीपीएलमध्ये तुफानी फलंदाजी; ७ चौकारांसह ठोकले अर्धशतक