इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना लीड्सच्या मैदानावर पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाला १ डाव आणि ७६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. तर यापूर्वी झालेल्या लॉर्ड्स कसोटीत भारतीय संघाने इंग्लंड संघावर विजय मिळवला होता.
त्यामुळे जो रुटच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाने लॉर्ड्स कसोटीत केलेल्या चुका दुरुस्त करत लीड्स कसोटीत जोरदार पुनरागमन केले. या विजयानंतर इंग्लंडचे माजी प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड भलतेच खुश झाले आहेत.
ख्रिस सिल्वरवूड यांनी म्हटले की,”रूटने लॉर्ड्स कसोटीवर अधिक लक्ष केंद्रित केले आणि काही महत्वाचे निर्णय घेतले. त्याने आपल्या चुका दुरुस्त केल्या. एका कर्णधारासाठी मागच्या सामन्यातील चुका दुरुस्त करणे अतिशय महत्त्वाचे असते. त्याने तसेच केले आणि सामन्यात त्याचा परिणाम देखील दिसून आला.”
तसेच ते पुढे म्हणाले की,”जो रूट आणि मी मिळून लॉर्ड्स कसोटीवर अधिक लक्ष केंद्रित केले होते. आम्ही एकमेकांसोबत चर्चा केली की आपण यातून काय शिकलो आणि आणखी चांगलं करू शकतो का. माझ्या मते नियंत्रित आक्रमकतेची आवश्यकता होती. गोलंदाजांनी योग्यरित्या गोलंदाजी केली. त्यांनी भारतीय संघातील शेवटच्या फलंदाजांना पूर्णपणे बॅकफूटवर ठेवले आणि त्यांना प्रत्येक वेळेस निर्णय घेण्यास भाग पाडले होते. मला तर असे वाटते की, तुम्ही नियंत्रणात येऊन देखील आक्रमक होऊ शकतात आणि खेळाडूंनी याचा योग्य वापर करून घेतला.”
हेडिंग्ले कसोटीत भारतीय संघाला १ डाव आणि ७६ धावांनी पराभूत करताच जो रूट इंग्लंडचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. जो रूटच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाने २७ कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. या बाबतीत त्याने मायकल वॉनला देखील मागे सोडले आहे. तसेच मालिकेतील चौथा कसोटी सामना येत्या २ सप्टेंबर पासून ओव्हलच्या मैदानावर पार पडणार आहे. या सामन्यात विजय मिळवून जो रूट कसोटी मालिकेत २-१ ची आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ओ शेठ! मेस्सी रोनाल्डोच्या फॅनची अफलातून रिल्स, लाखो व्हूव्जचा पडतोय पाऊस
चाळीस वर्षीय पाकिस्तानी खेळाडूची सीपीएलमध्ये तुफानी फलंदाजी; ७ चौकारांसह ठोकले अर्धशतक
‘पंतकडे इंग्लिश परिस्थितीत खेळण्याचे योग्य तंत्र नाही’, पाकिस्तानी क्रिकेटपटूची बोचरी टीका






