ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज मॅथ्यू हेडन याला वाटते की, भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला येईल तेव्हा रिषभ पंत (Rishabh Pant) त्यासाठी महत्त्वाचा खेळाडू असेल. गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील रिषभ पंतची कामगिरी पाहून या दिग्गज खेळाडूने हे वक्तव्य केले. पंतमध्ये विजयाची भूक दिसते, असे हेडनचे मत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही 5 सामन्यांची मालिका 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये सुरू होणार आहे. दोन्ही देशांमधील या मालिकेला मोठा इतिहास आहे.
‘क्रिकेट रेटिंग अवॉर्ड्स’च्या निमित्ताने हेडन म्हणाला, “रिषभ पंतसारख्या खेळाडूत जिंकण्याची भूक असते. गेल्या वेळी तो जेव्हा तिथे खेळला तेव्हा तो एक महत्त्वाचा खेळाडू होता. ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनाही त्याचा खेळ आवडला होता.”
हेडन पुढे म्हणाला, “पंतचा खेळ रोमांचक आणि उत्कृष्ट होता. तुमच्याकडे विराट कोहलीसारखे अनुभवी खेळाडू आहेत, ज्यांनी आपला ठसा उमटवायचा आहे. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा सामना करण्यासाठी भारत कोणत्या प्रकारची रणनीती आखेल हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.”
पंतने 2022 मध्ये एका गंभीर कार अपघातानंतर क्रिकेटमध्ये यशस्वी पुनरागमन केले. त्याने 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतासाठी चमकदार कामगिरी केली. ज्यामध्ये त्याने 97 आणि नाबाद 89 धावांची शानदार खेळी खेळी केलेली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात नाट्यमय सामन्यात अनेक महत्त्वाचे खेळाडू नसतानाही, भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.
भारतीय संघाने पहिल्या ॲडलेड कसोटीत 36 धावांत सर्वबाद झाल्यानंतर 2-1 असा विजय मिळवून पुनरागमन केले. यासोबतच सलग दुसऱ्यांदा बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकली. ॲडलेड सामन्यानंतर वैयक्तिक कारणांमुळे कोहलीला मायदेशी परतावे लागलेले. तर मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीसह इतर 5 खेळाडूंना दुखापती आणि फिटनेस संबंधित समस्यांमुळे बाहेर पडावे लागले होते. यावेळी भारतीय संघाकडे मालिका विजयाची हॅट्ट्रिक साधण्याची संधी असेल.
हेही वाचा –
“ब्रो पुरा बॉलीवूड नाश्ते मे खाता है”, रोहितच्या कूल लूकवर चाहते फिदा; सूर्यकुमारचीही कमेंट
भारताच्या माजी खेळाडूच्या मुलाला मिळाली इंग्लंडकडून खेळण्याची संधी, श्रीलंकेविरुद्ध उतरला मैदानात
‘यारो का यार गब्बर’! मुलाखत थांबवून शिखर धवनने रिषभ पंतला मारली मिठी, फोटो व्हायरल