दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात गुरुवारी (२८ एप्रिल) आयपीएल २०२२मधील ४१वा सामना झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीने ४ विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यात दिल्लीला चीयर करण्यासाठी आलेल्या चेहऱ्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत याची प्रेयसी ईशी नेगी हा तो चेहरा असून पंतची बहिण साक्षी पंतसोबत ती दिल्ली संघाला चीयर करताना दिसली आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दिल्ली विरुद्ध कोलाकातामधील (DC vs KKR) संपूर्ण सामन्यादरम्यान कॅमेरामनने ईशावरच (Isha Negi) कॅमेराचा फोकस ठेवला होता. त्यामुळे ती सामन्यादरम्यान बऱ्याचदा कॅमेरात कैद झाली आहे. कोलकाता संघाच्या विकेट्स पडल्यानंतर ईशा आणि साक्षी (Sakshi Pant) स्टँड्समध्ये एकत्र आनंद साजरा करतानाही दिसल्या आहेत. त्यांना एकत्र पाहून चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
https://twitter.com/PatilVishwajit_/status/1519734901729161216?s=20&t=lu_NnJdyvrYUsTBd-M2Pyw
She is gorgeous 😍 isha negi https://t.co/ukq49jEoO9
— Shahrukh Saifi🥀 (@Demonsaifi) April 28, 2022
ईशाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत एका चाहत्याने लिहिले आहे की, ‘आज वहिणी आल्या आहेत’. तर एकाने लिहिले आहे की, ‘वहिणी लेडी लक बनून आल्या आहेत’. तसेच अनेकांनी साक्षी व ईशा एकत्र आल्यानेही त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
https://twitter.com/Mayurrajani_511/status/1519770104409788416?s=20&t=lu_NnJdyvrYUsTBd-M2Pyw
Pant's sister Sakshi Pant and his girlfriend Isha Negi both at the stadium today for the #DCvKKR match 🔥🥰 pic.twitter.com/lgfoO4DljK
— Aakarsh 🍥 (@AakarshTweets) April 28, 2022
Isha Negi♥️ in the house lady luck @RishabhPant17 ?? #KKRvsDC #RishabhPant#IPL2022 pic.twitter.com/6POIO2GR0L
— JUST GHEE (@Justghee17) April 28, 2022
https://twitter.com/girly1718/status/1519686919021789184?s=20&t=PygB4WGU6b2vb1lWBVkskg
काय करते पंतची प्रेयसी ईशा?
पंत आणि ईशा यांचे नाते जगापासून लपून राहिलेले नाही. ते बऱ्याचदा सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करत असतात. ईशाबद्दल बोलायचे झाल्यास, ती एक बिजनेसवुमन आहे. ती इंटिरियर डेकोर डिझायनर आहे.
दिल्लीने जिंकली कोलकात्याविरुद्धची लढत
दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ विकेट्सच्या नुकसानावर १४६ धावा केल्या होत्या. यात कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर याच्या ४२ धावांच्या झुंजार खेळीचा समावेश होता. तसेच नितीश राणानेही ५७ धावांची धडाकेबाज खेळी खेळली होती. परंतु कोलकात्याचे इतर फलंदाज विशेष चमक दाखवू शकले नाहीत. या डावात दिल्लीकडून कुलदीप यादवने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच मुस्तफिजुर रेहमाननेही ३ विकेट्सचे योगदान दिले.
प्रत्युत्तरात दिल्लीकडून डेविड वॉर्नरने ४२ धावा केल्या. शेवटी रोमन पॉवेल आणि अक्षर पटेल यांनी जबरदस्त खेळ दाखवत संघाचा डाव वाचवला. पॉवेलने १६ चेंडूत ३ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने नाबाद ३३ धावा केल्या. तसेच अक्षर पटेलनेही २४ धावा केल्या. दिल्लीने १९व्या षटकातच ६ विकेट्सच्या नुकसानावर कोलकात्याचे लक्ष्य गाठले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १३: तब्बल १८ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा आशिष नेहरा
नाद नाद नादच! आयपीएल २०२२मधील सलग चार सामनावीर पुरस्कार दिल्लीच्या ‘या’ धुरंधराच्या झोळीत