भारतीय क्रिकेट संघाचा विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंत याच्याबाबत मोठे मेडिकल अपडेट समोर येत आहे. त्याच्या गुडघ्याची (लिगामेंट) शस्त्रक्रिया झाली असून ती यशस्वी राहिली असे वृत्त समोर येत आहे. तसेच त्याला या शस्त्रक्रियेनंतर ठीक वाटत आहे. पंतचा 30 डिसेंबर, 2022ला दिल्ली-डेहराडून महामार्गावर भीषण कार अपघात झाला होता. त्यानंतर त्याला डेहराडूनच्या हॉस्पिटलमध्ये भरती केले. पुढे त्याला मुंबईला हलवले गेले.
कार अपघातादरम्यान पंतला पाय आणि डोक्याबरोबर गुडघ्याची मोठी दुखापत झाली होती. एक विकेटकीपर-फलंदाज असल्याने त्याच्यासाठी ही मोठी गंभीर गोष्ट होती. आता त्याच्या गुडघ्यावरची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली ही नक्कीच आनंदाची बाब आहे. तसेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) लवकरच त्याच्या तब्येतीचे अपडेट जाहीर करेल.
“रिषभ पंतची गुडघ्याची लिगामेंट शस्त्रक्रिया शुक्रवारी पार पडली. तो सध्या डॉ. दिनशॉ पारडीवाला आणि बीसीसीआयचे मेडीकल पथ याच्या देखरेखीखाली आहे,” असे बीसीसीआयच्या सुत्राने पीटीआयला सांगितले.
25 वर्षीय पंत त्याच्या कुटुंबाला सरप्राईज देण्यासाठी एकटा दिल्लीहून रुरकीकडे निघाला होता. रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या नादात त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्याची गाडी डिवायडरला धकडून दुसऱ्या बाजूला गेली. त्यावेळी त्याची गाडी पूर्णपणे जळाली. यामध्ये त्याला अनेक दुखापती झाल्या.
अपघात झाल्यानंतर पंतला जवळील लोकांनी डेहराडूनच्या मॅक्स स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भरती केले. तेथे त्याच्या पाठीवर आणि डोक्यावर उपचार केले गेले. विशेष म्हणजे या अपघातात त्याच्या शरीराला कुठेही भाजले गेल्याचे निशान नाही. त्याच्यावर अनेक प्लास्टिक सर्जरीही झाल्या. गुडघ्याच्या उपचारासाठी त्याला मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये हलवले गेले.
पंत हा भारताच्या कसोटी संघाचा महत्वाचा भाग आहे. मागील अनेक सामन्यांमध्ये त्याने धावांचा रतीब घालत महत्वाची भुमिका पार पाडली. त्यातच भारत घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध फेब्रुवारी-मार्च महिन्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय दिग्गजाने ठेवले कॅप्टन हार्दिकच्या चुकांवर बोट: म्हणाला, “त्याने स्वतः…”
आता जडेजाची चर्चाही होत नाही! अक्षर पटेलच्या अष्टपैलू प्रदर्शनानंतर माजी दिग्गजाचे मोठे विधान