Thursday, February 2, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आता जडेजाची चर्चाही होत नाही! अक्षर पटेलच्या अष्टपैलू प्रदर्शनानंतर माजी दिग्गजाचे मोठे विधान

आता जडेजाची चर्चाही होत नाही! अक्षर पटेलच्या अष्टपैलू प्रदर्शनानंतर माजी दिग्गजाचे मोठे विधान

January 7, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Team-India

Photo Courtesy: Twitter/ICC


भारताचा दिग्गज अष्टपैलू रविंद्र जडेजा मागच्या मोठ्या काळापासून राष्ट्रीय संघातून बाहेर आहे. जडेजाचा पर्यायी खेळाडू म्हणून अक्षर पटेल भारतीय संघात खेळत असून चांगले प्रदर्शन देखील करत आहे. अक्षर पटेलने गुरुवारी (5 जानेवारी) श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात अर्धशतकीय खेळी आणि दोन विकेट्स घेतल्या. माजी भारतीय सलामीवीर वसीम जाफर याच्या मते अक्षर संघात आल्यापासून जडेजाची कमतरता जाणवत नाहीये

रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) मध्ये भारतीय संघासाठी खेलत होता. पण या स्पर्धेदरम्यान दुखापत झाल्यामुळे जडेजाने संघातून माघार घेतली. दुखापतीनंतर जडेजाची मोठी शस्त्रक्रिया झाली आणि मोठा काळ विश्रांती देखील घेतली. जडेजा आता लवकरच संघात पुनरागमन करणार असल्याचे सांगितले जात आहे. असे असले तरी, वसीम जाफर (Wasim Jaffer) याच्या मते अक्षर पटेल (Axar Patel) संघात असल्यामुळे जडेजाची जास्त चर्चा होत नाहीये. जडेजाचा बदली खेळाडू म्हणून श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळणाऱ्या अक्षरने गुरुवारी अष्टपैलू प्रदर्शन केले, पण संघाला विजय मात्र मिळवून देऊ शकला नाही. श्रीलंकन संघाने हा सामना 16 धावांच्या अंतराने जिंकला.

वसीम जाफर म्हणाला, “अक्षर असेच प्रदर्शन करत राहिला, तर तो स्टार अष्टपैलू रविंद्र जडेजाची संघातील जागा सहजरित्या मिळवू शकतो. जडेजा आशिया चषकात दुखापत झालापासून संघातून बाहेर आहे. भारतीय संघाला जडेजाची कमी जाणवू शकते, जो तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगले प्रदर्शन करत आला आहे. पण जेव्हापासून भारताला अक्षर पटेल मिळाला आहे, आपण जडेजाविषयी जास्त चर्चा करत नाहीये. यातून दिसते की, एका क्रिकेटपटूच्या रूपात अक्षर किती चांगले प्रदर्शन करत आहे.” जाफरच्या मते अक्षरने मागच्या काही काळात स्वतःच्या फलंदाजीत चांगली सुधारणा केली आहे.

दरम्यान, भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा दुसरा टी-20 सामना होता. मालिकेतील पहिला सामना भारताने, तर दुसरा सामना श्रीलंकेने जिंकल्यामुळे मालिका एक-एक अशा बरोबरीवर आहे. उभय संघांतील तिसरा आणि शेवटचा सामना शनिवारी (7 जानेवारी) राजकोडमध्ये खेळला जाईल. (Ravindra Jadeja is being forgotten because of Akshar Patel, Wasim Jaffer reaction)

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हा तर गोलंदाजांचा अपमान’, रन-आऊट प्रकरणात अश्विनने घेतली ऍडम झम्पाची बाजू, डेविस हसीला सुनावले
श्रीलंकेचा दिग्गज कुमार संगकारा फिट, पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये केले गेले यशस्वी उपचार


Next Post
Hardik Pandya & Shivam mavi

भारतीय दिग्गजाने ठेवले कॅप्टन हार्दिकच्या चुकांवर बोट: म्हणाला, "त्याने स्वतः..."

Photo Courtesy: Twitter/BCCI

आनंदाची बातमी! रिषभ पंतच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया यशस्वी, मुंबईत उपचार सुरू

Ravindra-jadeja-

'या' दिवशी जड्डू करणार टीम इंडियात कमबॅक! अश्विनने दिले संकेत

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143