---Advertisement---

रिषभ पंत कधीपर्यंत पुनरागमन करणार? दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर!

On: रविवार, ऑगस्ट 31, 2025 5:10 PM
---Advertisement---

रिषभ पंतने (Rishbh Pant) आपल्या दुखापतीवर मोठी अपडेट दिली आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती, त्यानंतर तो क्रिकेट मैदानापासून दूर आहे. आता त्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यात त्याच्या डाव्या पायाला अजूनही पट्टी बांधलेली दिसते. या फोटोमध्ये पंत जिममध्ये सराव करताना दिसत आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, अजून किती दिवस हे असेच चालणार ते सांगता येत नाही.

भारतीय विकेटकीपर-फलंदाजाने काही दिवसांपूर्वी आणखी एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्याने प्लास्टर लावलेल्या पायाचा फोटो दाखवला होता आणि अशा परिस्थितीचा त्याला तिटकारा आहे असंही सांगितलं होतं. एका व्हिडिओमध्ये त्याने पायावरचं प्लास्टर काढून दाखवलं होतं, मात्र अंगठ्याला अजूनही पट्टी होती. रिकव्हरीदरम्यान तो आयुष्य एन्जॉय करताना दिसला, कारण त्याने स्वतः पिझ्झा बनवतानाही एक व्हिडिओ शेअर केला होता.

आत्तापर्यंत रिषभ पंतच्या (Rishbh Pant) पुनरागमनाची तारीख निश्चित झालेली नाही. काही आठवड्यांपूर्वी आलेल्या रिपोर्टनुसार त्याला पूर्ण बरा होण्यासाठी किमान 6 आठवडे लागतील असं सांगण्यात आलं होतं. मँचेस्टर कसोटीत क्रिस वोक्सविरुद्ध रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न करताना त्याला ही दुखापत झाली. चेंडू बॅटला न लागता थेट त्याच्या पायावर बसला. या दुखापतीमुळे पंत मालिकेचा शेवटचा सामना खेळू शकला नाही. त्याला आशिया कपच्या (Asia Cup 2025) संघातही जागा मिळालेली नाही. आता भारत वेस्ट इंडिजविरुद्ध 2 कसोटी सामने खेळणार आहे. त्या आधी पंत फिट होतो का नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---